नवी दिल्ली:- अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज 2021-2022 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना काळात, संपूर्ण देशाला अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा होण्याची अपेक्षा होती. अर्थमंत्र्यांनीही अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या. विविध क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांनी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना कोरोना लसीबाबत मोठी घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, आपल्याकडे दोन वॅक्सिन आहेत आणि दोन आणखी वॅक्सिन लवकरच येणार आहेत. अर्थमंत्र्यांच्या या घोषणेमुळे देशात कोरोना लसीकरण कार्यक्रम आणखी सक्षमपणे देशभरात राबवण्यास मदत होईल.
देशात सध्या सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सीन लस उपलब्ध आहे. या दोन्ही वॅक्सिनचा वापर सध्या देशभरातील लसीकरणासाठी करण्यात येत आहे. परंतु आता अजून दोन लसी देशात येणार असल्यामुळे कोरोनाला हद्दपार करण्यास मदत होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ग्रामीण भागातील सामान्य महिलेचा प्रश्न केंद्र सरकारला कळत नाही का ? – जयंत पाटील
- #Budget2021 : मध्यमवर्गीय,बेरोजगार तरुणांच्या अपेक्षा बजेटमधून पूर्ण होणार का?
- #Budget2021 : यंदाच्या अर्थसंकल्पात गरिबांसह शेतकऱ्यांना प्राधान्य राहण्याची शक्यता
- #Budget2021 : शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या हिताचं बजेट असावं : संजय राऊत
- अहमदनगर जिल्हा बँक निवडणूक; पारनेर तालुक्यातील दिग्गजांमध्ये होणार लढत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

