Share

कुणी शाळा घेता का शाळा? २०० शाळा विक्रीला, तर मराठवाड्यात १३०० शाळा बंद होण्याच्या मार्गावर!

Published On: 

औरंगाबाद : कोरोनमुळे संपूर्ण अर्थचक्र विस्कळीत झाले आहे. त्यात शहरातील अनेक शाळाही अडचणीत सापडल्या आहेत. मागील वर्षापासून अनेक शाळा बंद आहेत. त्यात आवक बंद आणि खर्च सुरू असल्याने जमाखर्चाचे गणित बिघडले आहे. त्यामुळे शाळा हस्तांतरित किंवा चक्क विक्रीला काढण्यात आल्या आहेत. इंग्रजी माध्यमातील जिल्ह्यातील जवळपास २०० पेक्षा जास्त शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील ९० टक्के विक्रीला काढण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. मराठवाड्यात एकूण तेराशे शाळा आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत.

एकीकडे वर्षानुवर्षे वेगवेगळ्या प्रकारची फी, पुस्तके, गणवेश यांच्या माध्यमातून वसुली करून शाळा गब्बर झाल्या आहेत. तर दुसरीकडे कोरोनामुळे मार्च २०२० पासून बंद असलेल्या विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवायच्या कशा हा प्रश्न असलेले संस्थाचालक. ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू होत्या. मात्र त्या देखील काही दिवस चालवता आल्या. शाळा बंद झाल्या मात्र खर्च बंद झाले नाही. मालकीची इमारत नसलेल्या शाळांना भाडे देणे आवश्यक आहे. मिळकत नसल्याने भाडे कसे द्यावे त्यात शिक्षकांचे पगार कसे द्यावे असे असंख्य प्रश्न संस्थाचालकांना पडले. त्यामुळे अनेकांनी शाळा इतर लोकांना हस्तांतर करण्याचा निर्णय घेतला आहे तर काही जणांनी शाळांना टाळे ठोकले आहे.

शाळा हस्तांतरण करू इच्छिणाऱ्या शाळांनी प्रस्ताव देखील वरिष्ठ स्तरावर दिले आहे. त्यात मराठी आणि उर्दू माध्यमाच्या एकूण १३ शाळांनी प्रस्ताव दिले आहेत. दोन शाळेचे प्रस्ताव यावर्षीचे आहेत. तसेच या १३ पैकी दोन शाळांना मंजुरी देखील मिळाली आहे. तर पाच शासन स्तरावर प्रलंबित असून सहा शाळेबाबत अजून कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्याची इंग्रजी शाळांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यात जवळपास साडेतीन हजार शाळा आहेत तर जिल्ह्यात ७९५ शाळा आहेत. यातील ९० टक्के शाळा विक्रीला काढण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!