Share

आज इंग्लंड विरुद्ध न्युझीलंड; किवीचा संघ सहा वर्षानंतर ब्रिटनमध्ये खेळणार

Published On: 

मुंबई : आयपीएल स्पर्धा स्थगितीनंतर आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दोन मोठ संघ एकमेकाना भीडणार आहे. क्रिकेटची पंढरी समजली जाणाऱ्या लॉर्डस् मैदानावर इंग्लंड आणि न्युंझीलंड संघ आमने सामने होणार आहे. आयपीएलमधुन कोरनाच्या सावटानंतर हा मोठा सामना होणार आहे.

या सामन्याबद्दल महत्वाची बाब म्हणजे तब्बल सहा वर्षानंतर न्युझीलंडचा संघ इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळणार आहे. इंग्लंडने या मालिकेसाठी अनुभवी गोलंदाज स्टअर्ट ब्रॉडची उपकर्णधारपदी नियुक्ती केली आहे. तर कर्णधार जो रुटने काउंटी क्रिकेटमध्ये आपला हरवलेला फॉर्म परत मिळवला आहे. मात्र या मालिकेत अष्टपैलु खेळाडू बेन स्टोक्सची उणीव इंग्लंडला भासेल. मर्यादित षटकामध्ये नेतृत्व केल्यानंतर कसोटी सामन्यात ब्रॉडला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.

या सामन्यात इंग्लंडचा संघाने विजय मिळवला तर त्यांचा न्युझीलंडविरुद्ध ५०वा कसोटी विजय असेल. आणि न्युझीलंड विरुद्ध अशी कामगिरी करणारा हा पहिला संघ आहे. या सामन्यात यष्टीरक्षक बेन फोक्सच्या जागी यष्टीरक्षक जेम्स ब्रेसी हा इंग्लंडकडून पदार्पण करणार आहे. या दोन्ही संघात आतापर्यंत झालेल्या १०५ कसोटी सामन्यात इंग्लंडने ४९ तर न्युझीलंडने ११ कसोटी सामने जिंकले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!