कराची – पाकिस्तानात सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळू लागला असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या देखील वाढू लागली आहे. यातच आता पाकिस्तानने कोरोना संकटात आपली एक कोरोना प्रतिबंधक लस लॉन्च केली आहे.
या लसीचे नाव PakVac Covid-19 Vaccine ठेवण्यात आले आहे. असे असले तरी ही लस किती प्रभावी आहे, या लसीमुळे कोरोना आटोक्यात आणण्यात किती फायदेशीर आहे याबाबत कुठलीच माहिती देण्यात आलेली नाही.पंतप्रधान इम्रान खान यांचे स्वास्थ्य सल्लागार डॉ. फैसल सुलतान यांनी ही लस लाँच केली.
डॉ. फैसल सुलतान म्हणाले की, प्रत्येक संकटात एक संधी असते. कोरोना संकटात चीनने पाकिस्तानाचा मित्र राष्ट्र म्हणून खूप मदत केली आहे. जेव्हा पासून कोरोनाचे संकट आले आहे तेव्हापासून चीनने मदत केल्याचे सुलतान यांनी सांगितले.
या लसीच्या निर्मितीमध्ये देखील चीनने मदत केली आहे. याबाबत बोलताना सुलतान म्हणाले,कोरोना महामारीच्या काळात चीननं पाकिस्तानच्या मित्राची भूमिका बजावली आहे. पूर्वीपासून मित्र असलेला चीन कोरोना काळातही पाकिस्तानसोबत आहे, असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर ही लस तयार करणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य विभागाची त्यांनी प्रशंसा केली असून लवकरच या लशीचे उत्पादन वाढवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘उद्धवजी… जर शेतकऱ्यांना काही देऊ शकत नसाल तर किमान मारु तरी नका’
- ‘ओबीसी समाजावर अन्याय होत असताना भुजबळ, वड्डेट्टीवार हे नेते मात्र सत्तेत रममाण झाले’
- ‘सत्ता येणार… सत्ता येणार असे बोलून भाजपचे नेते जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत’
- कोरोनामुळे अनाथ झालेले एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये – सुप्रिया सुळे
- पदोन्नती मध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर आंदोलनाचा धडाका सुरू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

