Share

श्रेया घोषालनं बाळाला दिलं ‘हे’ नाव ; पोस्ट शेअर करत म्हणाली…

Published On: 

मुंबई : प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालला नुकतचं पुत्ररत्न लाभलं आहे. याची माहिती तिने स्वतः सोशल मीडियावर शेअर केली होती. श्रेयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत, ‘देवानं आम्हांला मुलाच्या रुपाने त्याचा आशिर्वाद दिला आहे. आई होणे ही एक सुंदर आणि भावूक अशी भावना आहे. याआधी असा अनुभव कधीच आला नव्हता. मी, शिलादित्य आणि आमचे संपूर्ण कुटुंब हा क्षण साजरा करत आहेत. तुम्हा सर्वांनी दिलेल्या आशिर्वादाबद्दल मनापासून धन्यवाद…’

काही दिवसांपूर्वी श्रेयाने आपण आई होणार असल्याची बातमी दिली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रेयाने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. कोरोना काळात सध्या मनोरंजन विश्वातून अशाच खूप चांगल्या बातम्या येत आहेत. करीना देखील दुसऱ्यांदा आई झाली.

https://www.instagram.com/p/CPm_D3TA1H7/?utm_source=ig_web_copy_link

आज श्रेयाने पोस्ट करत आपल्या मुलाचं नाव आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. श्रेयाने सोशल मीडियावर पती आणि मुलासोबत फोटो शेअर करत, आपल्या मुलाचं नाव देवयान ठेवल्याच सांगितलं आहे. श्रेयाने पोस्ट करत लिहिलं आहे, ‘देवयान मुखोपाध्यायची ओळख करून देत आहे. 22 मेला तो आमच्या आयुष्यात आला. आणि आमचं संपूर्ण जगच बदलून गेलं. फक्त आई वडीलचं आपल्या मुलाचा सहवास समजू शकतात. कधीही न संपणारं प्रेम या नात्यात असतं आणि हे सर्व माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखं आहे’. अशा भावना श्रेयाने यावेळी लिहिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!