Share

धक्कादायक : कोरोनाग्रस्त सासूने सुनेला जबरदस्ती मारली मिठी, सुनेचा रिपोर्ट आला…

Published On: 

मुंबई : आपण अनेकदा सासू-सून यांच्यातील भांडण ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल. टीव्हीवरील अनेक मालिकांचा विषयही सासू-सून यांच्या नात्याभोवती फिरत असतो. सासू सून यांच्यातील भांडण कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. पण सासू-सून या वादाला वेगळचं वळण लागल्याचं चित्र हैदराबादमध्ये पाहायला मिळालं. सुनेचा बदला घेण्यासाठी कोरोनाबाधित असलेल्या सासूनं तिला घट्ट मिठी मारल्याचा विचित्र प्रकार घडला आहे.

तेलंगणातील राजन्ना सिरीसिल्ला जिल्ह्यातील एलेरेड्डीपेटा गावात ही घटना घडली. कोरोना संसर्गाच्या काळात माणुसकीचं दर्शन दुर्लभ होत असल्याचं ऐकायला मिळतं. जिथे सख्ख्या नात्यातील माणसंच जीवावर उठतात, तिथे अनोळखी माणसांबाबत काय बोलावं. एलेरेड्डीपेटा गावातील राजण्णाचा विवाह थिम्माप्पूर येथील एका महिलेबरोबर झाला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. राजण्णा 7 महिन्यांपूर्वी नोकरीसाठी ओदिशाला गेला होता. तिथे तो ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून काम करतो.

राजण्णाची बायको, मुलं आणि सासूसोबत राहत होती. काही दिवसांपूर्वी सासूला कोरोनाची लागण झाली. तिला होम क्वारंटाईन करुन घरीच उपचार सुरु करण्यात आले. मात्र आपल्यापासून सून दुरावा ठेवत असल्याचं तिला पाहावलं नाही. ‘माझ्या जीवाचं काही बरंवाईट झालं, तर तू सुखाने जगू शकशील का?’ असा प्रश्न विचारत तिने सून आणि नातवंडांना भावनिक केलं. तिने सूनेला अनेक वेळा जवळ येण्यास भाग पाडून मिठ्या मारल्या, उद्देश हाच की तिलाही संसर्ग व्हावा.

सुनेलाही कोरोनाची लागण व्हावी या उद्धेशाने सासूने तिला मिठी मारली अन् झालंही सासूच्या मनासारखं. सुनेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सासूने तिला घराबाहेर काढलं आहे. अखेर तिने आपल्या बहिणीच्या घरी जाऊन हा प्रकार सांगितला. सासूमुळेच आपल्याला संसर्ग झाल्याचं तिने सांगितलं. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर खळबळ उडाली. सासूवर कठोर कारवाई करण्याची मागणीआता सर्वच स्तरातून केली जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!