Share

‘फडणवीसांच दुःख समजू शकतो, त्यांच्या टीकांना मी गंभीरपणे घेत नाही’; संजय राऊतांच प्रत्युत्तर

Published On: 

मुंबई : दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान, या भेटीनंतर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी टोलेबाजी करून फडणवीसांना लक्ष्य केलं.

नंतर फडणवीसांनी देखील खोचक शब्दांत संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं. ‘ ‘संजय राऊतांची अवस्था ना घर का, न घाट का अशी झालीये, याचा तुम्ही चुकीचा अर्थ घेऊ नका. मात्र त्यांना फारसं मनावर घेण्याची गरज नाही,’ अशी टिप्पणी फडणवीसांनी आपल्या जळगाव दौऱ्यात केली होती.

आता यावर संजय राऊत हे प्रत्युत्तर देणार नाहीत असं होणारच नाही. आज संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाष्य करत फडणवीसांवर निशाणा साधलाय. ‘ फडणवीस माझ्यावरच निशाणा साधतात. त्यांची टीका मी गंभीरपणे घेत नाही. ते माझे मित्र आहेत. मित्रं राहतील. त्यांचं दु:ख मी समजू शकतो. फडणवीसांना वाटतं, माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली. ते सत्तेत येऊ शकले नाहीत, त्यामुळे ते दु:खी आहेत. पण माझ्यावर टीका करण्यात त्यांना आनंद वाटत असेल तर त्यांनी खुशाल टीका करावी. पुढील साडेतीन वर्षे टीका करून त्यांनी आनंद घ्यावा,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस वैगेरे घडणार नाही…

पवार-फडणवीस भेटीबाबत बोलताना राऊत म्हणाले, या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस वैगेरे घडणार नाही. महाराष्ट्रातील राजकीय नेते एकमेकांना अशाप्रकारे भेटत असतात, आपल्याकडे तशी परंपरा आहे. रद पवार यांनी फडणवीसांना सत्तेचा कानमंत्र दिला असेल. विरोधी पक्ष अशाचप्रकारे सरकारच्या कामात अडथळे निर्माण करत राहिला तर पुढची 100 वर्षे तुमची सत्ता येणार नाही, हे पवारांनी फडणवीस यांना सांगितले असेल , असा खोचक टोला देखील संजय राऊत यांनी लगावला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!