Share

डॉक्टर महिलेची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये समजले ‘हे’ 

Published On: 

औरंगाबाद : घरगुती किरकोळ कारणावरुन डॉक्टरने मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. प्रियंका प्रमोद क्षीरसागर (२७, रा. कांचनवाडी) असे तिचे नाव आहे. तसेच आपल्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही असेही सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

डॉक्टर प्रियंका क्षीरसागर यांचे डॉ. पती प्रमोद क्षीरसागर हे घाटीतील औषधी निर्माण शास्त्र विभागात कार्यरत आहेत. या दोघांचा गेल्या पाच वर्षांपुर्वी विवाह झाला होता. मंगळवारी सकाळी डॉक्टर दांपत्यामध्ये घरातील किरकोळ कारणावरुन वाद झाला. अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, याच कारणातून डॉ. प्रियंका यांनी दुपारी बाराच्या सुमारास बेडरुममधील फॅनला दोरीने गळफास घेतला.

हा प्रकार समोर आल्यावर डॉ. प्रमोद यांनी सातारा पोलिसांशी संपर्क साधत माहिती दिली. पोलिस दाखल होईपर्यंत प्रियंका यांना बेशुध्द अवस्थेत फासावरुन खाली उतरविण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी प्रियंका यांना तात्काळ घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. प्रियंका यांच्या पश्चात पती आणि अडीच वर्षांचा मुलगा असल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली. पोलिसांनी प्रियंका यांनी लिहीलेली सुसाईड नोट हस्तगत केली आहे.

त्यामध्ये प्रियंका यांनी आपल्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरु नये असे म्हटले आहे. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद सातारा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक विक्रम वडणे करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!