Share

दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशनही महाविकास आघाडी सरकारला जड जाणार

Published On: 

मुंबई : कोरोनाचे कारण पुढे करून राज्य सरकारने अवघा २ दिवसांचे अधिवेशन घेण्याचे ठरवले आहे. राज्यात अनेक समस्या निर्माण झाल्या असताना आणि कोरोना काहीअंशी आटोक्यात आला असताना अवघ्या दोन दिवसांचे अधिवेशन घेण्यात येणार असल्याने ठाकरे सरकारवर चौफेर टीका होत आहे. सरकारचा नाकर्तेपणा जनतेसमोर येऊ नये म्हणूनच हे अधिवेशन दोन दिवसात उरकण्यात येणार असल्याचा आरोप विरोधीपक्ष करत आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुद्दा मार्गी लावण्याचा प्रयत्न सरकार करणार असून एक मोठे दिव्य या साठी सरकारला पार करावे लागणार आहे. विरोधकांनी देखील या दोन दिवसांच्या अधिवेशनात सरकारला घेरण्याची मोठी योजना आखली असून आक्रमक विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सामना कसा करावा हाच मुख्य प्रश्न महाविकास आघाडीच्या समोर आहे.

कोरोना काळात झालेला भ्रष्टाचार,आपत्तीग्रस्तांना मदत, नेत्यांवरील गंभीर आरोप, शेतकरी, विद्यार्थी यांच्या बाबतच्या प्रश्नांना उत्तरे देणे सरकारला जड जाणार आहे.यातच आता राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय. मराठा आरक्षण, राजकारणातील ओबीसी आरक्षण, पदोन्नती आरक्षण, धनगर आरक्षण यावरून राज्यात आंदोलने सुरु असतानाच आता मुस्लिम समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. समाजासाठी ५ टक्के आरक्षण त्वरित लागू करण्यासाठी आता वंचित बहुजन आघाडीने थेट विधानभवनावर मोर्चाची हाक दिली आहे.

वंचित बहुजन आघाडी आणि रजा अकादमीतर्फे हा मोर्चा काढण्यात येणार आहे.वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला ५ जुलै पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. सरकारला विधानभवनावर धडकणारा मोर्चा थांबवायचा असेल तर मुस्लिम समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा ५ जुलै रोजी होणारा हा मोर्चा अटळ असल्याचा इशारा देखील आंबेडकरांनी दिला आहे.

दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावर येत्या दि. 6 जुलै रोजी आझाद मैदानात पदोन्नती मधील आरक्षण या सह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्ष देखील आंदोलन करणार आहे. अनुसूचित जाती जमातींना आणि इतर मागासवर्गीयांना पदोन्नती मध्ये आरक्षण देण्यात यावे ; मराठा समाजाच्या आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाचा कायम पाठिंबा असून मराठा समाजाला आरक्षम मिळालेच पाहिजे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकलेच पाहिजे. जोपर्यंत ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत होत नाही तो पर्यंत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित ठेवाव्यात. तसेच मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्यात यावे या सह विविध मागण्यांसाठी मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षातर्फे दि.6 जुलै रोजी दुपारी 1 वाजता मुंबईत आझाद मैदान येथे निदर्शने आंदोलन आयोजित केले आहे अशी माहिती गौतम सोनवणे यांनी दिली आहे.

दरम्यान, सरकारदरबारी आपली दखल घेतली जात नसल्याचे पाहून आणखी काही समाज देखील आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा आरक्षणाची धग कायम असून ओबीसी आरक्षण आणि इतर आरक्षणांचा मुद्दा हा सरकारसाठी डोकेदुखी ठरणार आहे. दोन दिवसांच्या अधिवेश काळात कामकाज करण्यासाठी किती वेळ मिळणार? किती समाजाचे, वर्गाचे प्रश्न मार्गी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!