Share

फक्त मंदीरेच कोरोना पसरवतात असं वाटत का ? भाजपचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

Published On: 

मुंबई : राज्यातील मंदिरे खुली करण्यावरुन राज्यात मोठे राजकारण सुरु आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर विरोधक टीका-टिपण्णी करत आहेत. यातच सुरुवातीला भाजपने मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन केल्यानंतर मनसेने देखील आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या या मागणीचा चांगलाच समाचार घेत आज भिवंडीतील एका कार्यक्रमात टोलेबाजी केली.

यावर आता भाजपने पलटवार करत मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. ‘आरोग्य केंद्रे बंद करून मंदिरे उघडू का?’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. अहो पण आता मंदीर सोडून बंद काय आहे? सर्व आपण खुल केल आहे मग हिंदूच्या मंदिरावरच का राग? फक्त मंदीरच कोरोना पसरवतात असा वाटत का ?,’ असे सवाल करत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

नेमकं उद्धव ठाकरे काय म्हणाले होते ?

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात भिवंडीतील बंद पडलेल्या आरोग्य केंद्र सुरु करण्याची मागणी केली होती. या मागणीचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना लक्ष्य केलं. ‘आज मंदिरं जरी बंद असली तरी अत्यावश्यक आरोग्य मंदिरं मात्र सुरु आहेत. यासाठी जनता तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. धार्मिक स्थळं उघडली पाहीजेत, हरकत नाही. कपिल पाटीलजी तुमच्याकडे आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे ना, कि त्याच्या बाजूला मी मंदिरं उघडू. आरोग्य केंद्र बंद करून. आज आरोग्य केंद्र महत्त्वाचं आहे. आरोग्याची मंदिरं ही महत्त्वाची आहेत. मंदिरही उघडणार पण टप्पाटप्प्याने जाणार आहोत,’ असं देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!