🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ईडीने सत्ताधारी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर कारवाईचा बडगा उठवला आहे. या कारवाईमध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार प्रताप सरनाईक आदींचा समावेश आहे. या कारवाईवरुन सत्ताधारी नेत्यांकडूनही अनेक टीकात्मक वक्तव्य केली जात आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये ईडीच्या कारवाईवरुन टीका केली आहे.
‘गेल्या दोन-तीन वर्षांत देशात नवीन यंत्रणा लोकांना माहिती झाली आहे. त्या यंत्रणेचं नाव आहे ईडी. ही ईडी कुणाच्या मागे कशी लागेल काही सांगता येत नाही. कालच अकोल्यातून भावना गवळी नावाच्या शिवसेनेच्या खासदार आल्या होत्या. त्यांच्या ३-४ संस्था आहेत. ३ शिक्षणसंस्था आणि एक दुसरी छोटी संस्था आहे. त्याचा व्यवहारही २०-२५ कोटींच्या आत आहे. पण तिथेही ईडीने जाऊन त्यांना त्रास देत असल्याचं त्यांनी सांगितलं,’ असं शरद पवार यांनी म्हटलंय.
पवारांनी एकप्रकारे भावना गवळी यांचं समर्थन केल्यानंतर आता या त्यांच्यावर आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पवारांना काही सवाल केले आहेत. ‘शरद पवार भावना गवळी यांचा बचाव करत आहेत. पवार यांनी गवळींना विचारावं की, कपाटातून 7 कोटी चोरी गेले ते कुठून आले होते? 44 कोटी रुपये केंद्र सरकारचे आणि 11 कोटी रुपये स्टेट बँक ऑफ इंडियाचे, असा 55 कोटीचा कारखाना त्यांनी बुडवला. तो कारखाना 25 लाखात भावना गवळी कंपनीने विकत घेतला. शरद पवार यांनी याची चौकशी केली का?,’ असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तर आम्ही देखील जशास तसे उत्तर देणार’ ; स्वाभिमानीकडून सदाभाऊ खोत यांना इशारा
- आधी भानगडी करणारेच सरकारमध्ये होते, तर ईडी कशाला कारवाई करेल?; भाजपचं पवारांना प्रत्युत्तर
- अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने १०० कोटी रुपये द्या; नरेंद्र पाटील यांची मागणी
- ‘मोहन भागवत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणाले..’
- ईडी कुणाच्या मागे कशी लागेल काही सांगता येत नाही – शरद पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
