Share

‘त्या’ काँग्रेसबरोबर हात मिळवणी करून पेढे वाटताना शिवसेनेला लाज वाटली नाही का?

Published On: 

मुंबई : बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकविण्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बोलून दाखवलेलं स्वप्न मात्र भंग पावलेले आहे. बेळगावा महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भाजपने आपला झेंडा फडकाविला आहे. यावर भाजप कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. मात्र यावरच शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका करत खडेबोल सुनावले होते.

एकीकरण समिती मराठी माणसांची प्रातिनिधीक संघटना आहे. या संघटनेचा पराभव झाला म्हणून काही लोक महाराष्ट्रात पेढे वाटत आहेत. मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता. लाज वाटत नाही, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. दरम्यान याच मुद्द्याला धरून आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेनेला कोंडीत पकडले आहे.

‘बेळगावचा पराभव राऊतांच्या जिव्हारी लागला आहे. पण राऊतांनी बेळगावात मराठीचा नारा देऊन चूक केली आहे. पराभव झाल्यानंतर त्यांना पेढे खाल्याचे आठवलं. मला एकच गोष्ट संजय राऊतांना विचारायचं की, ज्या मराठी माणसाचा आणि हिंदुत्वाचा काँग्रेसने सातत्याने विरोध केला. त्या काँग्रेसबरोबर हात मिळवणी करून पेढे वाटताना त्यांना लाज वाटली नाही का? काँग्रेसशी हात मिळवणून करून त्यांनी हिंदुत्वाचा अपमान केला नाही का?, असा सवाल लाड यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!