सोलापूर : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांच्यातील वाद आता विकोपाला जात असल्याचे पहायला मिळत आहे. एकमेकांवर टीका करत असताना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेकदा वादही झाले आहेत. मात्र, आता हा वाद थेट हाणामारीवर आला आहे.
सदाभाऊंचा मुलगा तथा रयत क्रांती संघटनेचे युवा कार्याध्यक्ष सागर खोतसह चौघांनी वाळवा तालुक्यातील तांबवे गावातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रविकिरण माने या कार्यकर्त्याला सोमवारी रात्री ९ च्या सुमारास बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. माने यांच्या घरात घुसून चाकू, तलवारी, गुप्ती घेऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी कासेगाव पोलिसात सागर खोतसह चौंघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान यावर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्र्मक भूमिका घेत सदाभाऊंना इशाराच दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते रणजीत बागल यांनी फेसबुक पोस्ट करून त्यांचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
रणजीत बागल यांची फेसबुक पोस्ट :
काल वाळवा तालुक्यातील तांबवे गावचे स्वाभिमानीचे नेते रविकिरण माने यांच्या घरी रात्री 10 वाजता सागर सदाशिव खोत व त्यांच्या चार बगलबच्चांनी घुसखोरी केली. घरी असलेल्या माने यांना शिवीगाळ करत तु राजु शेट्टीचे लय काम करतो,मोर्चाला बोलवुन लोकं नेतो,सदाभाऊवर बोलतो असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच गावात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
याबाबत रविकिरण माने यांनी कासेगाव येथिल पोलिस ठाण्यात तक्रार दिली असुन तपास सुरू आहे. परंतु यातुन एक अधोरेखित होतं आहे ते म्हणजे राजु शेट्टी साहेबांच्या पाठिशी लोकांचं मिळत असलेलं प्रेम लोकांचा उदंड पाठिंबा,आणि पुन्हा लोकांना राजु शेट्टींच्या कार्याची झालेली जाणीव यामुळेच या लोकांच्या पायाखालील वाळु सरकु लागली आहे.
आपली आमदारकीची मुदत संपत आली आहे आणि इकडे राजु शेट्टी पुन्हा नव्या जोमाने ऊस पट्ट्यात गावागावात लोकांच्या हृदयात पुन्हा अढळ स्थान निर्माण करत आहेत. यामुळेच या लोकांना कुठेतरी पोटशूळ उठला आहे. राजू शेट्टींची जातीयवादी प्रतिमा निर्माण करता करता त्यांनी स्वतःची प्रतिमा गावगुंड अशी तयार करवुन घेतली आहे. रविकिरण माने यांच्यावर हल्ला करणार्यांवर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी गृह विभागाला मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मागणी करतो.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भाजपाकडे लाचखोर नवऱ्याची बायको, हे चित्र लोकांना विचित्र वाटते!’, मेहबूब शेख यांचा हल्लाबोल सुरूच
- आधी भानगडी करणारेच सरकारमध्ये होते, तर ईडी कशाला कारवाई करेल?; भाजपचं पवारांना प्रत्युत्तर
- अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने १०० कोटी रुपये द्या; नरेंद्र पाटील यांची मागणी
- ‘मोहन भागवत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणाले..’
- ईडी कुणाच्या मागे कशी लागेल काही सांगता येत नाही – शरद पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

