Share

ईडी कुणाच्या मागे कशी लागेल काही सांगता येत नाही – शरद पवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ईडीने सत्ताधारी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर कारवाईचा बडगा उठवला आहे. या कारवाईमध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार प्रताप सरनाईक आदींचा समावेश आहे. या कारवाईवरुन सत्ताधारी नेत्यांकडूनही अनेक टीकात्मक वक्तव्य केली जात आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये ईडीच्या कारवाईवरुन टीका केली आहे.

‘गेल्या दोन-तीन वर्षांत देशात नवीन यंत्रणा लोकांना माहिती झाली आहे. त्या यंत्रणेचं नाव आहे ईडी. ही ईडी कुणाच्या मागे कशी लागेल काही सांगता येत नाही. कालच अकोल्यातून भावना गवळी नावाच्या शिवसेनेच्या खासदार आल्या होत्या. त्यांच्या ३-४ संस्था आहेत. ३ शिक्षणसंस्था आणि एक दुसरी छोटी संस्था आहे. त्याचा व्यवहारही २०-२५ कोटींच्या आत आहे. पण तिथेही ईडीने जाऊन त्यांना त्रास देत असल्याचं त्यांनी सांगितलं,’ असं शरद पवार यांनी म्हटलंय.

यासोबतच, ‘महाराष्ट्रात इतक्या वर्षांत इतक्या ईडीच्या केसेस कधी ऐकल्या आहेत का तुम्ही? खडसे, अनिल देशमुख, प्रताप सरनाईक अशा अनेक जणांच्या विरोधात केसेस आहेत. हल्ली विरोधकांना त्रास देण्यासाठी याचा साधन म्हणून वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ठीक आहे. काही काळ येतो, नंतर जातो. जेव्हा हा काळ जाईल, तेव्हा यात दुरुस्त्या होतील,’ असं देखील शरद पवार यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!