Share

‘तुम्हाला वाटलं मी ड्राय स्टेटमध्ये 5 दिवस राहिन?’: मिम्स वरती शास्त्री यांची विनोदी प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. जेव्हा भारतीय संघ एखादा क्रिकेट सामना पराभूत होतो, तेव्हा चाहते खेळाडूंसह शास्त्री यांच्या डोक्यावर संघाच्या पराभवाचे खापर फोडताना दिसतात. बऱ्याचदा या गोष्टीवरुन त्यांना ट्रोल केले जाते.

भारतीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांचे सोशल मीडियावर बरेच मिम्स व्हायरल होत असतात आणि इंग्लंडविरुद्ध अहमदाबादमधील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतरही नेटकऱ्यांनी संधी सोडली नाही आणि शास्त्री यांच्यावरील मिम्स शेअर केले. यामधील एका मिमवर शास्त्री यांनी विनोद प्रतिक्रिया दिली.

प्रख्यात स्तंभलेखक आणि कादंबरीकार शोभा डे यांनी शास्त्रीवर एक मिम शेअर केला होता आणि त्यांच्या मद्यपान करण्याच्या सवयीची खिल्ली उडवली. “तुला वाटलं मी ड्राय स्टेटमध्ये पाच दिवस राहीन?” शास्त्री यांच्या फोटोवर या मिममध्ये म्हटले आहे. भारतीय मुख्य प्रशिक्षक यांनी विनोदपणे उत्तर दिले, “बँटर आवडले! या कठीण काळात हसू आणणे चांगले वाटते.” दरम्यान, भारत विरुद्ध इंग्लंड संघात नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेला दिवस-रात्र सामना भारताने १० विकेट्सने जिंकला.  या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!