Share

‘या जगात फक्त राजकारण्यांनी जगायचं का?’; प्रवीण तरडेचा संतप्त प्रश्न

Published On: 

मुंबई : एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात आत्महत्या केली आहे. स्वप्निल लोणकर (वय-२४) असे त्याचे नाव आहे. स्वप्निलने फुरसुंगी परिसरातीलराहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली.

ही घटना बुधवारी (दि.२९ जून) रोजी घडली आहे. पण त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी काल सापडल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगत त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्यात तो पास देखील झाला होता. पण, यानंतरही त्याला नोकरी मिळाली नाही. याच नैराश्यातून त्याने हे धक्कादायक पाऊल उचलले.

या घटनेमुळे अनेकांच्या संतप्त प्रतिक्रिया समाजातून येत आहे, स्वप्नीलच्या आत्महत्येनं त्यांच कुटुंब दुःखात बुडालं आहे. स्वप्निलच्या मृत्यूचं वृत्त त्याची आई छाया लोणकर यांच्यासाठी मोठा आघात ठरला. या सर्व प्रकरणामुळे ठाकरे सरकारवर सडकून टीकास्त्र डागले.

स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतर समाजातील सर्वच स्तरातून या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील बेधडक विचार मांडणारा अभिनेता प्रवीण तरडे यांनी देखील यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘या जगात फक्त राजकारण्यांनी जगायचं का? त्यांच्या पोरा-बायकांनी, त्यांच्या नातेवाईकांनी जगायचं? आणि सामान्य माणसांनी मरायचं… त्यामुळे आपण यांच्याबदद्ल गोड-गोड बोलणं बंद केलं पाहिजे. नाहीतर शेतकरी मरणार, एमपीएसी करणारे मरणार, कला क्षेत्रातली माणसं मरणार, मग जगणार कोण राजकरणासंबधातली लोकं?, असा सवालही प्रवीण तरडे यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!