मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला संघाला अखेर विजयी सुर गवसला आहे. इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ४ गडी राखुन विजय मिळवला आहे. इंग्लंडने दिलेल्या २२० धावांचे लक्ष्य ६ गडी गमावत पार केले.
या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मात्र या सामन्यानंतर तिच्या स्ट्राईक रेटवर अनेक चाहत्यांनी टिका केली. मिताली ने या टिकेला जोरदार प्रत्युत्तर देत टिकाकारांची तोंडे बंद केली आहे. तिसऱ्या सामन्यानंतर बोलताना तिने या टिकेला उत्तर देताना म्हणाली, ‘माझ्या स्ट्राईक रेटवर होत असलेली टीक मी बघीतली आहे. याबद्दल मी काही स्पष्टीकरण द्यावे अशी गरज मला वाटत नाही. लोकांना खुश करणे माझी जबाबदारी नाही.’ असे ती म्हणाली.
यावेळी पुढे बोलताना ती म्हणाली,’संघ व्यवस्थापनानं दिलेली जबाबदारी पुर्ण करणे माझं काम आहे. स्ट्राईक रेटपेक्षा संघाचा विजय माझ्यासाठी महत्वाचा आहे. २२ वर्षे क्रिकेट खेळुनही धावा काढण्याची माझी भूक कमी झाली नाही. विजयाच्या जिद्दीने मी आजही मैदानात उतरत असते.’ असे म्हणाली. मीतालीने नुकतेच आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २२ वर्षे पुर्ण केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘या’ कारणामुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पराभवाचा सामना करावा लागेल : कुक
- …तरीही शिखर धवनला संधी नाहीचं
- आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरवात; मराठा, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजणार
- रहाणेच्या अपयशावर बोट ठेवत संजय बांगरने सुचवले ‘हे’ पर्याय
- भारतीय संघाला दुय्यम म्हणणाऱ्या रणतुंगाला आकाश चोप्राने दिले सडेतोड उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

