🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगचा याचा शनिवारी ४१ वा जन्मदिवस होता. त्याच्या जन्मदिवसानिमित्त त्याला एक खास भेट मिळाली आहे ती म्हणजे त्याच्या 41 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने निर्मात्यांनी त्याच्या पदार्पणातील चित्रपट ‘फ्रेंडशिप’चे पोस्टर प्रदर्शित केला आहे. यामुळे हरभजनचा जन्मदिवस अजूनच खास ठरला.
जगभरातील अनेक क्रिकेटपटू क्रिकेटमधील कारकिर्द संपल्यानंतर क्रिकेटपेक्षा वेगळ्या क्षेत्रात पाऊल ठेवतात. अनेकांनी क्रिकेट कारकिर्दीनंतर राजकारण, अभिनय, व्यावसाय अशा वेगवेगळ्या क्षेत्रात स्वत:ला आजमावून पाहिले आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनी याने देखील क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शेती व्यवसायाकडे वळला आता यात भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगचाही समावेश आहे. तो भारतीय संघातून मागील अनेक वर्षापासून दूर आहे, या दरम्यान तो अनेकदा टेलिव्हिजनवर झळकला आहे.
Big News! Cricket legend @harbhajan_singh announces his big debut on silver screen with #Friendship, on his 41st birthday! Poster out NOW! #Arjun @actorsathish #Losliya pic.twitter.com/tUfUKT44w6
— Ramesh Bala (@rameshlaus) July 3, 2021
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० हून अधिक विकेट्स घेतलेला हरभजन सिंग ‘फ्रेंडशिप’ या तमिळ चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे. हा चित्रपट तेलुगू आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर १ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे.
या टीझरमधून हरभजनची विविध रुपं चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. तो या टीझरमध्ये डान्स करताना दिसला आहे. तसेच दाक्षिणात्य पद्धतीची लुंगी नेसतानाही दिसत आहे. याबरोबरच तो मारामारी करतानाही दिसत आहे. तसेच मारामारी केल्यानंतर त्याला पोलिसांनी तुरुंगात टाकल्याचेही दिसले आहे. एवढेच नाही तर तो टीझरच्या शेवटी क्रिकेट खेळतानाही दिसला आहे. पॉल राज आणि सुर्याने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात हरभजन बरोबर अर्जुन आणि तमिळ बिग बॉस फेम लोसिया मारियोनेसन देखील झळकणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- …तरीही शिखर धवनला संधी नाहीचं
- आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरवात; मराठा, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजणार
- रहाणेच्या अपयशावर बोट ठेवत संजय बांगरने सुचवले ‘हे’ पर्याय
- भारतीय संघाला दुय्यम म्हणणाऱ्या रणतुंगाला आकाश चोप्राने दिले सडेतोड उत्तर
- ‘भारतीय संघ इंग्लंडमध्ये यशस्वी होईल’, चॅपेलनी व्यक्त केला विश्वास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

