Share

दादा कोंडकेंच्या घराचा फोटो शेअर करत प्रथमेश परबने वेधले अनेकांचे लक्ष्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक खास ओळख असलेले अभिनेते-निर्माते दादा कोंडके यांच्या एका काळात प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याच्या अभिनयाने रसिकांच्या मनात एक वेगळीच छाप त्यांनी निर्माण केली. मात्र इतक्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराची सध्या काय अवस्था आहे याकडे अभिनेता प्रथमेस परब याने अनेकांचे लक्ष केंद्रित केले आहे.

याबाबत प्रथमेस परब याने सोशल मिडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.दादा कोंडकेंच्या घराबाहेरील फोटो शेअर करत लिहिले की. ‘आयुष्यभर इतरांना हसवणारे दादा, आपल्याच घराला अशा अवस्थेत पाहून हसत असतील? असा प्रश्न प्रथमेश परबने केला आहे.

प्रथमेस परबची पोस्ट  – 
सुन्न…!!

विस्तीर्ण निळ्या नभाखाली दिसत असलेलं, मोडकळीस आलेलं घरं दुसरं तिसरं कोणाचं नसून, आपल्या महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार दादा कोंडके यांचं आहे. हे दादांचं रहातं घरं! हा फोटो झूम करून पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की या घराची किती दयनीय अवस्था झाली आहे ते! आयुष्यभर इतरांना हसवणारे दादा, आपल्याच घराला अशा अवस्थेत पाहून हसत असतील?? ज्या व्यक्तीने, हाऊसफुलच्या बोर्ड्सने चित्रपटगृहाची शोभा वाढविली, आपल्या अभिनयाने, प्रेक्षकांच्या मनात हक्काचं घर निर्माण केलं, खरंच, आज त्याच व्यक्तीच्या घराचं संवर्धन करणं, इतकं अवघड आहे का????? प्रश्न अनेक आहेत!! काही सुन्न करणारे तर काही अनुत्तरित….!!

8 ऑगस्ट 1932 रोजी दादा कोंडके यांचा जन्म झाला होता.  त्यांचे पूर्ण नाव कृष्णादादा कोंडके होते. त्यांचा ‘तांबडी माती’ हा पहिला चित्रपट 1969 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर चंदू जमादार, राम-राम गंगाराम, राम राम आमथाराम, एकताजीव सदाशिव आणि अंधेरी रात में दिया तेरे हाथ में हे होते. या चित्रपटांनी मराठीत चांगली कामगिरी केली, तर ‘अंधेरी रात में दिया तेरे हाथ में’ हिंदीमध्ये खूप लोकप्रिय झाला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!