🕒 1 min read
नाशिक : पाणी ही संपत्ती आहे, तिचा वापर जपून झाला पाहिजे. यासाठी प्राधान्याने पिण्याच्या पाण्याचे व त्यानंतर शेती व औद्योगिक क्षेत्रासाठी पाण्याचे आरक्षण निश्चित करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने पाटबंधारे विभागाने पेयजलास प्राथमिकता देऊन शेतीसाठी पाणी वाटपाचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. नाशिक मनपाचे पाणी आरक्षण मंजूर करण्यात आले असून त्यात कपात झाली नसल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पाटबंधारे प्रकल्पातील पाणी आरक्षण निश्चिती समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी भुजबळ बोलत होते. नाशिक पाटबंधारे विभाग कार्यक्षेत्रातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांतर्गत गोदावरी व तापी खोरे प्रकल्प धरणसमूहामधील ७६.१५ टक्के तसेच दारणा, नांदूरमध्यमेश्वर व कडवा प्रकल्पातील ९२.३२ टक्के, गंगापूर धरणसमूहात ९८.५१ टक्के, ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पात ९५.९२ टक्के याप्रमाणे जिल्ह्यात ९५.५२ टक्के टीएमसी पाणीसाठा आहे.
यातून प्राधान्याने आकस्मिक पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करत नियोजन केल्यास पाणी आरक्षणात सर्वांना न्याय देता येणार आहे. मालेगाव तालुक्याला पाणीपुरवठा करताना ४८ दिवसांच्या अंतराने पाणी सोडण्यात येऊन गिरणारे योजनेंतर्गत कशाप्रकारे पाणीपुरवठा होत आहे. याबाबत माहिती घेऊन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना भुजबळ यांनी दिल्या.
नाशिक जिल्ह्यात अनेक गावात दिवाळीपूर्वी अंधार पसरला असून वीज कंपनीने विनासूचना वीज कापल्याने ही स्थिती निर्माण झालीये. त्यावर भुजबळ म्हणाले की, या संस्थांची जी वीज बिले आहेत त्यातील ६४ टक्के हिस्सा राज्य सरकार भरणार आहे. ३६ टक्के रक्कम लाभधारकांनी भरायची आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम तीन हप्त्यात भरायची असून शेवटचा हप्ता थेट मार्च महिन्यात भरावा लागणार आहे आणि सध्या दिवाळी तोंडावर असल्याने वीज कापू नका, असे स्पष्ट आदेश दिल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
थकीत वीजबिल भरण्याबाबत शासनाची सकारात्मक भूमिका आहे. रब्बी हंगामाच्या पिकांसाठी पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी वीज वितरणने सहानुभूतीपूर्वक विचार करावा. वीजपुरवठा खंडित न करता वीज बिल भरण्यासाठी दिवाळीपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. अशा सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘त्यांना आहे तिथेच ठेवा, इथे आले तर…’, फडणवीसांचे टीकास्त्र
- जगाला सध्या धार्मिक, आर्थिक व राजकीय दहशतवादापासून धोका-रामदेव बाबा
- ‘देख लो यारो, गधे घोडे दौडा रहे है…’; भातखळकरांचा मलिकांना टोला
- ईडी म्हणजे पानतंबाखुचे दुकान, माझ्या घरीही धाड पडू शकते-आ. प्रणिती शिंदे
- ‘मोदी सरकारने पीक विम्याचा हप्ता रोखला’, सचिन सावंत यांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
