मुंबई : काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये रुग्णालयाची ऑक्सिजन टाकी लीक झाल्याने २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यानंतर, विरार पश्चिमेकडे विजय वल्लभ कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत १४ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. अशातच आता ठाण्यातील वर्तकनगर येथील खाजगी वेदांता रुग्णालयातील ऑक्सिजन अभावी चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. हा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली आहे.
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयात धाव घेतली असून ते या घटनेची माहिती घेत आहेत. याप्रकरणाची चौकशी सहा सदस्यीय समितीकडून केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. ऑक्सिजन अभावीच रुग्णांचा मृत्यू झाला असून शल्यचिकित्सकांनी चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांसह भाजप व मनसेच्या नेत्यांनी केली आहे. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ‘रोज राज्यात रुग्णालयात कधी आगीमुळे तर कधी ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होतोय. मात्र आरोग्य मंत्री फक्त भाषण करत फिरतात, इतक्या घटना घडत असताना आरोग्य मंत्र्यांची हकलापट्टी का केली जात नाही? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- केंद्राने घोषणा केली ४० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची अन् दिले २६ हजारच; मंत्री शिंगणेंची माहिती
- ‘ठाकरे सरकारमधील नेते श्रेयासाठी हपापलेले, त्यामुळेच शिवसेना आणि काँग्रेसचे पित्त खवळले’
- महिलेचा छळ करणारा संजय राऊत हा विकृत माणूस, त्यांना अटक झालीच पाहिजे – निलेश राणे
- ‘रजनी सर म्हातारे होत आहेत म्हणून…’ जडेजाच्या कामगिरीनंतर धोनीचे ट्विट व्हायरल
- इशारा काय देता ? बदनामीचा खटला दाखल कराच; मुश्रीफांचे चंद्रकांत पाटलांना आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

