औरंगाबाद : मनपाच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये बुधवारी रात्री ऑक्सिजन पुरवठ्याचे प्रेशर कमी झाले होते. त्यामुळे कोरोनाचे आठ रुग्ण खबरदारीचा उपाय म्हणून घाटी व खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. नंतर रात्री उशिरा ऑक्सिजनचा वाढीव साठा मिळाला. त्यामुळे इतर रुग्णांना काहीच त्रास झाला नाही. अशी माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. मेल्ट्रॉनच्या आयसीयु मध्ये १० तर ऑक्सिजनवर ६७ रुग्ण उपचार घेत होते. सध्या ऑक्सिजन कमी पडत नसल्याचा दावा प्रशासन करत असले तरी मनपाच्या सेंटर मध्ये बुधवारी ऑक्सिजन पातळी खालावली असल्याचा प्रकार समोर आला.
दीड तासाने नियोजित ऑक्सिजन सिलेंडर मिळाले. मात्र दरम्यानच्या काळात रुग्णांचा जीव टांगणीला लागला होता. सर्व रुग्ण हलवणे शक्य नसल्याने गंभीर अवस्थेतील रुग्ण इतरत्र हलविल्यास इतर रुग्णांना ऑक्सिजनचे प्रेशर मिळू शकेल असे डॉक्टरांचे म्हणणे होते. त्यामुळे मनपाच्या स्तरावर अधिकाऱ्यांनी निर्णय घेत रुग्णांना या ठिकाणाहून हलवले. त्यातील काही रुग्ण घाटीत तर काही खासगी मध्ये दाखल झाले. रात्री साडेनऊ वाजता हा प्रकार घडला. त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी काहींना रात्रीचे अकरा वाजले होते.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या माध्यमातून हवेतून ऑक्सीजन निर्मितीचे दोन प्लांट तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून दोन प्लांट असे एकूण चार प्लांट उभारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने जाहीर केला होता. मात्र आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये मंजूर केलेला ऑक्सिजन प्लांट घाटी रुग्णालयात उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मेल्ट्रॉनमधील रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सीबीएसईने १२ वीची बोर्ड परीक्षा रद्द करावी ; सुप्रीम कोर्टात याचिका
- भूमीपूजन कार्यक्रम! मंत्री भुमरेंचा माफीनामा खंडपीठाने नाकारला
- बंदुकीचा धाक दाखवून व्हिडीओ क्लीप व्हायरल, दोघे गजाआड
- मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही; मेटे आक्रमक
- ‘मी पदावर असलो नसलो तरी उजनीच्या पाण्याबाबत लढा दिला आहे हे जनतेस सारे ठाऊक आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

