औरंंगाबाद : बंदुकीचा धाक दाखवत व्हिडीओ क्लीप तयार करत सोशल मिडीयावर व्हायरल केलेल्या दोघांच्या गुन्हे शाखा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हा व्हिडीओ १२ मे रोजी व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी गौतम बाबासाहेब बनकर (रा. मिसारवाडी) आणि राजू शंकर खरात (रा. अजंठा अर्बन बँक, जुना मोंढा) यांना ताब्यात घेण्यात आले.
राजू खरात याच्या नावे शस्त्र परवाना आहे. त्याने गौतम बनकर याला व्हिडीओ क्लिप तयार करण्यासाठी बारा बोअरची बंदूक हाताळण्यासाठी दिली. त्याचा व्हिडीओ देखील दोघांनी सोशल मिडीयावर व्हायरल केला.
व्हिडीओ व्हायरल झाल्याचे पाहून गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विठ्ठल जवखेडे, जमादार शेख हबीब, विजय निकम, पोलीस नाईक शिवलिंग होनराव, गोविंद पचरंडे, जायभाये आदींच्या पथकाने दोघांच्या मुसक्या आवळल्या. बंदुकीचा धाक दाखवून व्हिडीआ क्लिप व्हायरल करणार्या दोघांविरूध्द सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मला टीम इंडियाचा अभिमान’ ; रवी शास्त्री यांनी केले भारतीय संघाचे अभिनंदन
- सोशल मीडियासाठी काढलेल्या ६ कोटी रुपयांच्या कंत्राटावर अजित पवारांचे मोठे भाष्य,म्हणाले…
- ‘केंद्राने महाराष्ट्रात पुरवलेल्या व्हेंटिलेटरमध्ये मोठा घोटाळा’, काँग्रेसचा आरोप
- …तर त्यांना बाजूला घेऊन नाराजी सांगेन; कथित नाराजी नाट्यावर अजितदादांच खटक्यावर बोट !
- ठरलं ! स्पुटनिक व्ही लसीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

