Share

दिवाळी गोड होऊ देणार नाही; शेट्टींच्या या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…

Published On: 

सातारा : शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रकमी मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. शेट्टी यांनी एफआरपीसाठी येत्या 7 ऑक्टोबरपासून राज्यात ‘जागर एफआरपी’चा हे आंदोलन छेडणार असल्याची घोषणा केली होती. तसेच आमचा दसरा कडवट झाला तर राज्यातील एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला होता. यावेळी त्यांनी एफआरपीच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली होती. शेंट्टींच्या टीकेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी  अक्षरश: उसाच्या एफआरपीबद्दल गुजरात आणि महाराष्ट्रातील कारखान्यांचं संपूर्ण गणितच सांगितलं आहे.

शेतकऱ्यांचा दसरा कडू झाला तर नेत्यांना दिवाळी गोड करू देणार नाही असे राजू शेट्टी म्हणालेत.यासंदर्भात विचारलं असता अजित पवार यांनी महाराष्ट्रातलं साखर कारखान्यांचं गणित सांगितलं. मागच्या वर्षीची रिकव्हरी काय आहे हे पाहून आपण एफआरपी देतो. एक टक्का साखर वाढली तर 10 किलोला टनामागे 300 रुपयांचा फरक पडतो, असे वाटते. गुजरात मध्ये तीन टप्यात पैसे दिले जातात, त्यामुळे गुजरात राज्यातील शेतकऱ्यांना 500 ते 600 रुपये टनाला जास्त भाव मिळतो, साखरेचं पोत तयार झाले की 1 रुपये व्याज सुरु होते, हे व्याज शेतक-यांच्याच पैशातून दिलं जातं, असं गणित अजित पवारांनी सांगितलं आहे.

15 तारखेला कारखाने सुरु होतायत, दहा कोटी रुपयांची साखर पडून आहे, म्हणजे दररोज रोज दहा लाख रुपये व्याज सुरु होत आहे, याचा भुर्दंड पडतो. आर्थिक प्रश्न आहेत, चर्चा सुरु आहेत, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे त्याचंया पध्दतीने सागंतायत त्या बाबत चर्चा करुन निर्णय घेता येईल, असं अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!