औरंगाबाद : कोरोना संसर्गाचा आज पर्यंत मराठवाड्याने मोठ्या धैर्याने सामना केला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असल्याने या परिस्थितीचा पूर्ण क्षमतेने सामना करण्यासाठी सर्व रुग्णालयांनी आदेशित केल्याप्रमाणे येत्या तीन दिवसांत खाटांची उलब्धता करावी अन्यथा रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी रविवारी (१४) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिला.
यावेळी बोलतांना केंद्रेकर म्हणाले की, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या बैठकीत अनेक रुग्णालयांना खाटा वाढविण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये धुत हॉस्पिटलला १५० खाटा वाढविण्याचे निर्देश दिलेले असताना केवळ ८७ खाटा वाढविल्या, हेडगेवार हॉस्पीटलला २०० खाटा वाढविण्याचे निर्देश दिलेले असताना केवळ ७२ खाटा वाढविल्या तर बजाज हॉस्पीटलला १५० खाटा वाढविण्याचे निर्देश दिलेले असताना केवळ ५० खाटा वाढविल्या, तसेच एमआयटी, जे.जे.प्लस, सावंगीकर आणि माणिक हॉस्पीटलने देखील निर्देशित केल्याप्रमाणे खाटा न वाढविल्याने या रुग्णालयांना नोटीस देऊन उर्वरित खाटा येत्या तीन दिवसांत वाढविण्याचे आदेश देखील आयुक्तांनी दिले आहेत. तसेच एमजीएम रुग्णालयाला २०० तर घाटीला ५०८ खाटा वाढविण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी यावेळी दिल्या.
विभागीय आयुक्तांनी यावेळी उदिष्टापेक्षा अधिक प्रमाणात खाटांची उपलब्ध केलेल्या रुग्णालयांचे कौतुक देखील केले. कृष्णा हॉस्पीटलने ५० खाटांचे उद्दिष्ट्य दिलले असताना ६१ खाटा वाढविल्या, लाईफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलने २९ खाटांचे उद्दिष्ट्य दिलेले असताना ४२ खाटा वाढविल्या त्याबद्दल तर एशियन सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलने ८० चे उद्दिष्ट्य दिलेले असतना अधिकच्या ५०, युनायटेड सिग्मा हॉस्पीटलने १०० चे उद्दिष्ट्य दिलेले असतना अधिकच्या ५० खाटा वाढविणार असून ममता हॉस्पिटलला देखील तांत्रिक सहाय्य पुरविणार असल्याचे सांगितल्याने विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.
महत्त्वाच्या बातम्या
- परभणी जिल्ह्यात रविवारी 87 व्यक्ती कोरोनाबाधित, एका रुग्णाचा मृत्यू
- भाजपचा मास्टर प्लान,केंद्रीय मंत्र्यासह चार खासदारांना भाजपने दिले विधानसभेचे तिकीट
- ममता बॅनर्जींसोबत घडलेली घटना ही घातपात नसून अपघात : निवडणूक आयोग
-
विजय हजारे ट्रॉफीत पृथ्वी शॉने रचला इतिहास
- सुर्यकुमार यादव आणि इशान किशनच्या समावेशानंतर मायकल वॉनचे हे टिवट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
