औरंगाबाद : मान्सून आगमनाच्या अनुषंगाने मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक घेत जिल्हाधिकारी यांनी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन मान्सूनसाठी सर्व यंत्रणांनी निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने सज्ज राहण्याच्या सूचना सर्व यंत्रणा प्रमुखांना केल्या. जिल्ह्यात एक मोठे (जायकवाडी) तसेच १६ मध्यम तर ९६ लहान असे एकूण ११३ पाटबंधारे प्रकल्प आहेत. याशिवाय बरेच पाझर तलाव, जुने तलाव आहेत. या तलावांचे सर्वेक्षण व गळतीबाबत तपासणी करुन अहवाल सादर करावा, असे आदेश त्यांनी दिले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक शुक्रवारी (दि. १४) जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. जिल्हाधिकारी म्हणाले की, येणार्या मान्सूनच्या संभाव्य आपत्तीसाठी सर्व यंत्रणांनी आपल्या विभागातील नियोजन करुन सज्ज राहावे. काही अडचणी, धोके, लक्षात येताच तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षास वेळोवेळी कळविणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व तलावांची दुरुस्ती व पूर परिस्थितीचे नियोजन करावे. त्याचबरोबर संभाव्य धोक्यांचा ठिकाणी नागरिकांना माहिती व सावध करण्याच्या दृष्टीने सूचनांचे फलक लावण्याच्या सूचना चव्हाण यांनी दिल्या.
जि. प. सीईओ डॉ. गोंदवले यांनीही पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीस संबंधित विभाग नियोजन करीत असून परस्पर समन्वय राखत असल्याचे सांगितले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. गव्हाणे यांनी जिल्ह्यातील विविध विभागातील मान्सूनपूर्व तयारीबाबत संगणकीय सादरीकरण केले. निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी, पावसाळ्यातील पूरपरिस्थितीमुळे धोकादायक पूल, जुन्या इमारती यांचा अहवाल सादर करावा तसेच वीज पडून होणारी जीवित हानी टाळण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी व खबरदारी याबाबत लोकजागृती करण्याच्या सूचना दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘म्युकरमायकोसिस’चा लातुरात शिरकाव; ५ रुग्ण आढळले
- लसीकरणाचा एक दिवसाचा थाट, पालिकेकडे केवळ ४ हजारांचा साठा!
- ‘पालकमंत्र्यांनी बारामतीच्या इनामदारीचा पट्टा काढून सोलापूरकरांची सेवा करावी’
- ‘१ जून नंतर तुला घराबाहेर पडू देणार नाही’, किरीट सोमय्यांना धमकी
- फेसबुकवर जवळीक साधत तरुणाने केला विवाहितेचा विनयभंग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

