मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत असतात. आता किरीट सोमय्या यांना धमकी मिळाल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत. या संदर्भात त्यांनी मुलुंडचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांना पत्र पाठवून, आवश्यक ती पावलं उचलण्याची विनंती केली आहे.
दोन दिवसांपूर्वी १३ मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास व्हॉट्स अॅपवर त्यांना एक मेसेज आला. हा मेसेज मराठीमध्ये होता. ‘१ जून नंतर तुला घराबाहेर पडू देणार नाही, काय करतो बघ. मुलुंडला येऊन सांगतो तुला’ असा तो संदेश होता. हा धमकीचा संदेश पाठवणारा माणूस कोण आहे? ते मी शोधू शकलो नाही. त्यामुळे आरोपीला शोधून काढण्यासाठी जे आवश्यक आहे, ते सर्व करा असे किरीट सोमय्या यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या आणि शिवसेना यांच्यात अनेक दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कडव्या विरोधामुळे सोमय्यांना उमेदवारी मिळू शकली नव्हती त्यांच्या जागेवर मनोज कोटक यांनी लोकसभा लढवून विजय मिळवला होता.
महत्वाच्या बातम्या
- स्पा सेंटरच्या नावाखाली कुंटनखाना चालवणारा गजाआड
- गावागावात जा, घरोघरी जा आणि कोरोनाच्या टेस्ट करा ; मोदींचे आदेश
- कपील शर्माची सुमोन १० वर्षापासुन लढत आहे ‘या’ आजाराशी
- इंदापूरला नेण्यात येणारे पाणी रद्द करा;अन्यथा…; नारायण पाटलांचा निर्वाणीचा इशारा
- ‘श्रीमंतीची झिंग’ सांगणाऱ्या ‘कंदिल’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

