Share

‘म्युकरमायकोसिस’चा लातुरात शिरकाव; ५ रुग्ण आढळले

Published On: 

लातूर: जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असतानाचा आता म्युकरमायकोसिस या आजाराचा देखील शिरकाव झाला आहे. हा आजरा बुरशीजन्य आजारांमध्ये मोडतो. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतनाच या आजाराच्या शिरकावाने लातूरकरांच्या चिंतेत भर पडली आहे. या आजाराची लागण झालेले ५ रुग्ण आढळले आहेत. येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

म्युकरमायकोसिसच्या ५ रुग्णांपैकी एकाला डिस्चार्ज देण्यात आला आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी दिली. पाचपैकी एका रुग्णाच्या डोळ्यात बुरशी वाढल्याने शस्त्रक्रिया करुन डोळा काढावा लागला, तर चौघांच्या नाकात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे कान-नाक-घसा विभागाचे डॉ. विनोद कंदाकुरे यांनी सांगितले. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये १५ दिवसानंतर ‘म्युकर मायकोसिस’ची लक्षणे आढळल्याचे काही जिल्ह्यांत आढळले आहे.

बुरशीजन्य आजार नाकात होतो व नंतर त्याचा संसर्ग डोळ्यांना होतो. अशा लक्षणाचे पाच रुग्ण लातूर जिल्ह्यात आढळली असून, त्यांना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील चार रुग्ण मधुमेहाचे (डायबेटीस) आहेत. पाचपैकी एका रुग्णाच्या एका डोळ्याला संसर्ग झाल्याने तो डोळा शस्त्रक्रिया करुन काढावा लागला, तर अन्य चार रुग्णांच्या नाकातील वाढलेला बुरशीचा भाग शस्त्रक्रियेद्वारे काढला. एका रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असून, अन्य चार रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे डॉ. विनोद कंदाकुरे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!