🕒 1 min read
औरंगाबाद : जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवारी लॉकडाऊन बाबत नवीन आदेश जारी करण्यात आले आहे. या मध्ये ३१ मार्च ते ९ एप्रिल २०२० दरम्यान लॉकडाऊनचा कालावधी असणार आहे. तर मंगळवारी ( दि. ३०) रोजी सर्व आस्थापना तसेच कार्यालये सायंकाळी ८ वाजेपर्यंत पुर्ववत चालु राहणार असल्याचे या वेळी नवीन आदेशात म्हटले आहे.
दरम्यान राष्ट्रीय तसेच राज्यातील विद्यापीठ, शासन, शिक्षण मंडळ , बँका आदी स्तरावरील पुर्व केलेल्या परिक्षांकरिता येण्या जाण्यासाठी सुट देण्यात आली आहे. तसेच परिक्षा देण्याऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधीत परिक्षेचे प्रवेशपत्र ( हॉलटिकीट) परिक्षेदरम्यान सोबत बाळगणे अनिवार्य असणार आहे. याची विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे आवाहन देखील या वेळी करण्यात आले आहे.
तसेच लॉकडाऊन काळामध्ये म्हणजेच शहरातील नागरिकांसाठी पेट्रोलपंप सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेमध्ये खुले असणार आहेत. तर नागरिकांनी आवश्यकता असेल तरच पेट्रोल पंपावर जावे, जेणे करुन गर्दी करणे टळणार आहे. तर दुपारी १२ वाजेनंतर फक्त अत्यावश्यक सेवेमधील तसेच ज्यांना संचारबंदीमधून सूट दिलेली आहेत. त्यांनाच पेट्रोल पंपधारक पेट्रोलचा पुरवढा करतील असेही या नवीन बदलामध्ये उल्लेख केलेला आहे.
औरंगाबाद जिल्हाभरातील होम आयसोलेशन मधील कोव्हिड – १९ रुग्णांची संख्या लक्षात घेवून प्रशासनाने हॉटेल्सला होम डिलीव्हरी साठी रात्री ८ वाजेपर्यंत परवानगी असणार आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था, समूह यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन तसेच भादंविनुसार १८८ नुसार कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे नवीन आदेशामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. हे आदेश सोमवारी दुपारी काढण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- पंढरपूर पोटनिवडणूक : भाजपचं ठरल ! ‘हा’ नेता उद्या भरणार उमेदवारी अर्ज
- ऑपरेशन लोटस सुरु ? चंद्रकांतदादा म्हणाले, पहाटेच्या शपथविधी सारखं समजेलच !
- ‘चित्रा वाघ, नवनीत राणा, तृप्ती देसाईंना दिपाली चव्हाण प्रकरणात पॉलिटिकल मायलेज दिसत नाही’
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपने ज्यांना उमेदवारी दिली ते समाधान अवताडे कोण आहेत ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
