परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष – उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यातील नवनिर्वाचित इच्छुक संचालक, मातब्बर नेते स्थानिक पातळीपासून ते मुंबईतील पक्षश्रेष्ठीपर्यंत मोर्चेबांधणी करणार असल्याचे वेध लागले आहेत. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात हा विषय जाणार हे मात्र नक्की.
काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर या दोघांच्या पॅनलला जिल्हा बँक निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकले नाही. तर या दोन्हीही मातब्बर नेत्यांनी स्पष्ट बहुमत मिळावे या करिता निवडणुकीतून वेळवेगळ्या खेळी देखील खेळल्या. डावपेच लढवले होते. त्यातून एकमेकांवर मोठ्या प्रमाणात कुरघोडी – फोडाफोडी देखील केली. परंतू दोघांच्या पॅनलला स्पष्ट असे बहुमत मिळु शकले नाही. वरपुडकर गटाने सर्वाधिक संख्याबळ मिळवले आहे. बोर्डीकर गट देखील काठावरच पास झाला आहे.
याचा परिणाम आता जिल्हा बँकेच्या अध्यक्ष – उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोघा मातब्बरांना मोठ्या कसरती कराव्या लागणार आहेत. हे मात्र आरश्या सारखे स्वच्छ झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना या दोघांनी अधिकृत अशी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याने या दोघांमध्ये पुन्हा काहीतरी शिजत असल्याचे दिसते. या उलट या दोघांनी मोठी सावधगिरी बाळगली आहे. जसे विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेना – काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडी करुन सत्ता स्थापन केली. तशीच काहीशी रंगीत तालिम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परंतु पडद्याआड मंगळवारपासूनच दोघांनी पुढील मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. आमदार सुरेश वरपुडकर यांनी निकाल लागल्यापासून भाजपचे नेते बालाजी देसाई यांना विजयोत्सवापासुन सोबतच ठेवले होते. तर त्यामधुन देसाई हे आपल्यासोबतच आहेत, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला. माजी आमदार बोर्डीकर यांनी स्वतःच्या भावाचा पराभव करणार्या राजेश विटेकर यांना मतमोजणीनंतर पाचारण करुन धक्का दिला. या पार्श्वभूमीवर या दोघा दिग्गज नेत्यांचे डावपेच समर्थकांसह राजकीय वर्तुळास प्रकर्षाने दिसून आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- रेल्वे विभागाचा मनमानी कारभार, हैद्राबाद-हडपसर रेल्वे कायमची बंद
- वयाने, अनुभवाने, संपत्तीने एवढे मोठे आहात थोडं खरं बोलायला शिका; अमृता फडणवीसांचा पुन्हा प्रहार
- ‘या’ गावात मिळणार पाच रुपयात २० लिटर पाणी !
- एन व्ही रामण्णा नवे सरन्यायाधीश ? शरद बोबडेंकडून शिफारस
- आणखीन एक बदली प्रकरण, औरंगाबादच्या निलंबित कारागृह अधीक्षकाने मागितले इच्छामरण


