सिल्लोड : कोरोनाच्या संकटात शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे. अशा परिस्थितीत खते व बियाणांची चढ्या भावाने होणारी विक्री निंदनीय असून व्यापारी व कंपन्यांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे असे मत व्यक्त करीत पायोनीयर सिड्स कंपनीने सामाजिक दायित्व निधीतून शेतकऱ्यांना पेरणी यंत्रसाठी आर्थिक मदत मिळवून दिली. याबाबत कंपणीच्या उपक्रमाचे अभिनंदन करून शेतकऱ्यांशी निगडित मोठ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका ठेवली पाहिजे असे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे केले.
पायोनीयर सिड्स कंपनीच्या वतीने सीएसआर मधून औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास २०० शेतकऱ्यांना पेरणी यंत्र घेण्यासाठी प्रत्येकी ३० हजार रुपयांची सबसिडी देण्यात आली. या सबसिडीतून खरेदी करण्यात आलेल्या सिल्लोड तालुक्यातील मोजक्या शेतकऱ्यांना सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते पेरणी यंत्राचे वाटप तसेच कंपनीच्या वतीने बाजारात आणलेल्या नवीन मका वाणाचा शुभारंभ राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाला.
रविवार ( दि. २३ ) शहरातील जि. प. शाळेच्या मैदानात हा कार्यक्रम संपन्न झाला. शेतकऱ्यांना देण्यात आलेले पेरणी यंत्र हे अत्याधुनिक पध्दतीचे यंत्र असून या यंत्राचा प्रामुख्याने मका लागवडीसाठी वापर होतो. या यंत्रामुळे झाडांची संख्या वाढते. यामुळे उत्पन्नात निश्चित वाढ होते त्यासोबतच शेतकऱ्यांना परवडेल अशा दरात कंपनीने पी ३३०२ हे मक्याचे बियाणे बाजारात आणले असल्याची माहिती पायोनीयर कंपनीच्या वतीने यावेळी देण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- एमआयडीसी वाळूज परिसरातील ‘ते’ हॉटेल अखेर सिल
- अखेर सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाचे रुप पालटणार, केंद्रीय प्राधिकरणाने ३ वर्षापूर्वी केल्या होत्या सूचना!
- आरटीओ कार्यालयाची फसवणूक करणाऱ्या एजंटाच्या पोलिस कोठडीत वाढ
- …अन् मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या मेटेंनी केलं अजितदादांच कौतुक !
- ‘मोदी, ठाकरेंनी टिव्हीवर येण्यापूर्वी गरिबांचा विचार करावा’


