Share

कोरोणाच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरला मारहाण करणे ही निषेधार्ह बाब म्हणाला ‘ हा ‘ बडा नेता

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर अगदी संकटकाळात स्वतःचा जीव धोक्यात घालून डॉक्टर ,नर्स आणि रुग्णालयातील कर्मचारी अत्यावशक सेवा देत आहेत.पण काल रात्री आठच्या सुमारास मालेगाव येथे एम आय एम चे स्थानिक आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल व त्यांच्या २५ – ३० कार्यकर्त्यांनी चक्क मालेगाव इथल्या शासकीय रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर डांगे यांनी शिवीगाळ करत मारहाण केली.आणि या मारहाणीचे कारण फक्त डॉ.डांगे यांनी फोन उचलला नाही म्हणून मारहाण केली.यावर डॉ.डांगे यांच्या म्हणण्यानुसार रुग्णालयात दोन कोरोना चे संशयित रुग्ण आहेत.त्यांच्यावर उपचार करण्यात व्यस्त असतांना मला हे फोन आले आहेत.

तर उपचार करण्यात व्यस्त असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण करणे सध्याच्या काळात उचित आहे का? या प्रश्नावर राज्याचे कषीमंत्री आणि मालेगांव ग्रामीणचे आमदार दादाजी भुसे यांनी महाराष्ट्र देशाला प्रतिक्रिया देताना सांगितले की,’ सद्या देशात काय परिस्थिती आहे आणि आमदार महोदय काय करत आहेत.आमदारांनी थोडेफार परिस्थितीचे भान ठेवत काम केले पाहिजे.

कारण स्वतःचा जीव धोक्यात घालून डॉक्टर काम करत आहेत.त्यांचा थोडाफार आदर करावा. डॉक्टरांना मारहाण करणे हे अगदीच निषेधार्ह आहे.तसेच जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक करावाई व्हावी.

दरम्यान, डॉ.डांगे यांना मारहाण केल्यामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या लोकांकडून आणि त्यांच्या नातेवाइकांकडून आमदार मोहम्मद इस्माईल आणि त्यांच्या कार्यकर्त्या विषयी प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.तसेच सूत्रांनी अशी सुद्धा माहिती दिली आहे की ‘ डॉ.किशोर डांगे यांचा कामचुकारपणा याधीच्या काळात बराच वाढलेला होता.आमदारांनी वेळोवेळी त्याला समज देऊन सुधारण्याचा प्रयत्न केला होता.पण शेवटी सहनशीलतेचा कडेलोट झाला आणि हा सगळा प्रकार घडला.पण सध्याच्या काळात मारहाण करने हे उचित आहे का? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!