मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप सव्वा वर्षाचा अवधी आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नियोजन भाजपाने सुरू केल्याचे वृत्त आल्यापासून या निवडणुकीचा विषय राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे.
मुंबई भाजपच्या विद्यमान कार्यकारिणीच्या कार्यकाळातच मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल, असा विश्वास व्यक्त करत भ्रष्टाचाराचे आगार असलेली मुंबई महापालिकेची सत्ता २०२२ मध्ये उलथवून लावायची, असे निर्देश भाजपाचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या माध्यमातून फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने बिहारनंतर आता ‘मिशन मुंबई’ सुरू केले आहे.
यानंतर, शिवसेनेनं देखील चोख उत्तर देत मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार असं ठणकावलं होतं. राज्यातील महविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ती झाली असून अनेक नेत्यांसह मंत्र्यांनी विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखत देत सरकारच्या कामाची माहिती देतानाच भाजपला लक्ष्य केलं आहे.
अशातच मुंबईमध्ये झळकलेले बॅनर सद्या चर्चेचा मुद्दा ठरत आहे. शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी सरकारचं अभिनंदन करणारे होर्डिंग लावले आहेत. या होर्डिंगवर ‘मुंबई शिवसेनेची, शिवसेनेची मुंबई’ असं विधान असल्याने भाजपला इशाराच दिला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार असला तरी मुख्य लढत ही भाजप विरुद्ध शिवसेनाच असल्याचं चित्र सद्या निर्माण होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘राष्ट्रवादी महाआघडीतून बाहेर पडणार नाही, भाजपने आता स्वत:च्या जीवावर सत्तेत येण्याची स्वप्ने बघावी’
- ‘माझ्या पत्नीच्या संदर्भात शिवसेनेचे नेते बोलतात, पण मी सयंम बाळगतो’
- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची लढत चुरशीची होणार !
- ‘अशोक चव्हाण आणि अजितदादांचे फ्यूज उडाले नाही तर आमचे सरकार 20 वर्ष टिकेल’
- ‘गृहमंत्र्यांनी देश चालवायला हवा, अमित शाह छोट्या-छोट्या निवडणुका मॅनेज करण्यात व्यस्त’


