Share

‘ईडी’ची नोटीस आली कि खडसेंना कोरोना होतो; महाजनांचा टोला

Published On: 

जळगाव : जळगाव महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासूनची भाजपची सत्ता उलथवण्यात शिवसेनेला यश आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली होती. ‘गिरीश महाजन हे नियमित व्यायाम करून फिट राहतात. यंग नेते म्हणून ते परिचित आहेत. गिरीश महाजन यांना झालेला कोरोना खरा आहे की, जळगाव महापालिकेतील भाजपाची सत्ता गेल्याचा हा कोरोना आहे. याचा तपास केला पाहिजे,’ असे खडसे म्हणाले होते.

गिरीश महाजन यांनी कोरोनावर मात करून आल्यानंतर त्यांनी एकनाथ खडसेंवर जोरदार पलटवार केला आहे. ‘एकनाथ खडसे यांना ‘ईडी’च्या नोटिसा आणि तारखांमुळे कोरोना होतो. पण माझे तसे नाही,’ अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.

गेल्या दहा दिवसांपासून गिरीश महाजन यांच्यावर उपचार सुरू होते. नुकत्याच केलेल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर महाजन यांनी जळगावात येऊन जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालायात पाहणी करून आरोग्य यंत्रणा व करोना उपाययोजनेचा आढावा घेतला आहे.

पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले कि, ‘मला एकदाच कोरोना झाला. दहा दिवस सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होतो. सोमवारी माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मला करोना होतो, तो ‘ईडी’च्या तारखा पाहून होत नाही. सन्मानीय नेते एकनाथ खडसे यांना ‘ईडी’ची तारीख आली की, लगेच कोरोना होतो. ते खासगी हॉस्पिटलमध्ये जातात किंवा घरीच क्वॉरंटाइन होतात. मुंबईत फिरतात.’ असा टोला पण त्यांनी यावेळी लावला.

पुढे ते म्हणाले कि ‘माझे तसे नाही. मला एकदाच कोरोना झाला. माझ्या पूर्ण कुटुंबाला झाला. आम्ही सर्वांनी सरकारी दवाखान्यात उपचार घेतले. खोटी सर्टफिकेट्स जोडून मुंबईतील हॉस्पिटलला जात नाही. घरी क्वारंटाइन सांगून मुंबईत फिरत नाही,’ असा प्रहार महाजन यांनी केला. तरुण असो की पहेलवान, सर्वांनाच कोरोना होत आहे, असेही यावेळी महाजन म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!