Share

‘सत्यनारायण की कथा’तून दिग्दर्शक समिर विद्वांस करणार बॉलिवुडमध्ये पदार्पण

Published On: 

मुंबई : कार्तिक आर्यन हा बॉलीवूडचा नवा चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जाउ लागला आहे. काही दिवसापुर्वी करण जोहरने त्याला ‘दोस्ताना २’ या चित्रपटातुन बाहेरचा रस्ता दाखवला होता. यानंतर कार्तिक आर्यनच्या मदतीला सुप्रसिद्ध निर्माता साजिद नाडियाडवाला पुढे सरसावले आहे. त्यानी कार्तिक आर्यनला त्याच्या नविन चित्रपटात संधी दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक समिर विद्वांस हे करणार आहे.

साजीद नाडीयावाला यांची निर्मीती असलेल्या नविन चित्रपटाची घोषणा आज २३ जुन रोजी करण्यात आली. ‘सत्यनारायण की कथा’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. या चित्रपटाच्या घोषणेचा प्रोमो ट्विटरवर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात कार्तीक आर्यंनची प्रमुख भूमिका असणार आहे. त्याच्याव्यतीरिक्त इतर कलाकारांचे नाव अद्यापही गुलदस्त्यात आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटील येणार आहे.

मागील वर्षी साजिद नाडियाडवाला यांच्या ‘छिछोरे’ चित्रपटाला बेस्ट फिचर फिल्म तर समीर विध्वांस यांच्या ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटासाला बेस्ट फिल्म ऑन सोशल इश्यू असे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. आता हे दोघे एकत्र काम करत असल्याने नक्कीच काहितरी चांगली कलाकृती बघायला मिळेल अशी अपेक्षा प्रेक्षक करत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!