Share

अभिनेत्री दिपाली सय्यदचा दिलदारपणा; पूरग्रस्त १००० मुलींच्या लग्नाची स्वीकारली जबाबदारी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आला होता. त्यामुळे या जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. परंतु आता सरकारच्या मदतीमुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे.

याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री दिपाली सय्यदने एक मोठा निर्णय घेतला आहे. पूरग्रस्त भागातील १००० मुलींच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारली आहे. दिपालीने सांगली-कोल्हापूर भागाची पाहणी करून पूरग्रस्त लोकांची भेट घेतली आहे. यावेळी १००० हजार मुलींच्या लग्नाची जबाबदारी घेतल्याचं दिपालीने जाहीर केलं आहे.

याविषयी बोलताना दिपाली सय्यद यांनी प्रत्येक मुलीच्या नावाने ५० हजार रूपयांची मुदत ठेव पावती करण्यात येणार आहे. ही रक्कम त्या मुलीच्या लग्नासाठी वापरण्यात येणार आहे. यात एकूण ५ कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती दिपाली सय्यद यांनी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या या मदतीमुळे अनेक मुलींचे संसार उभे राहणार आहेत.

दरम्यान, यापूर्वीही अनेक कलाकारांनी या भागातील गरजूंसाठी मदत केली आहे. त्यात रितेश देशमुख, अक्षय कुमार तसेच संतोष जुवेकर, सुबोध भावे यांचा समावेश आहे. तसेच राज्य आणि केंद्र सरकारही पूरग्रस्तांसाठी मदत करताना दिसत आहेत. त्यमुळे या भागातील जनतेचे जीवन पूर्वपदावर येत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!