टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार भारतीय कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या नावाची चर्चा सुरू होती. परंतु राज्याची विधानसभा निवडणूक जवळ आल्याने त्यांनी ही निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसत आहे.
अजित पवार हे सध्या महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे ते भारतीय कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. भारतीय कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदासाठी प्रत्येक संघटनेकडून २ नावे मागविण्यात आली आहेत. त्यामुळे राज्य कबड्डी संघटनेकडून आस्वाद पाटील यांचे नावे निश्चित केले आहे.
याविषयी बोलताना अजित पवार यांनी ‘राज्याची निवडणूक जवळ आली आहे. मी जे काम हाती घेतो, ते पूर्ण जबाबदारीने पार पाडतो. विधानसभा निवडणुकीमुळे भारतीय महासंघाच्या अध्यक्षपदासाठी मला वेळ देता येणार नाही. त्या पदासाठी वेळ देऊ शकत नसेल तर तिथे जाणे अयोग्य आहे असं विधान केले.
- लेटर बॉम्ब इफेक्ट : राष्ट्रवादीच्या नेत्यांवर पक्षात गटबाजी नसल्याचं सांगण्याची वेळ
- सगळा अनुभव पणाला लावणार आणि १७५ जागा जिंकणार; अजित पवारांचा निर्धार
- मोदी-शहांनी ‘या’ नेत्याच्या खांद्यावर दिली महाराष्ट्राच्या प्रभारीपदाची धुरा
- सुभाष देशमुखांचा दिलदारपणा : १,२ नव्हे तब्बल २४ पूरग्रस्त गावं घेतली दत्तक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

