Share

पूरग्रस्तांना दिलासा : मराठी कलाकरांकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर सांगलीला आलेला महापूर हा भयंकर होता. या महापुरात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागरिक अन्न, वस्त्र , निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. नागरिकांना आर्थिक फटका बसलाचं आहे. त्यात आता महापुरामुळे रोगराई पसरू लागली आहे. चित्रपटसृष्टीतील कलाकारही पूरग्रस्तांच्या मदतीला सरसावले आहेत.

याच पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांना जमेल तशी मदत करा, असे आवाहन सिनेसृष्टीतील कलाकारांनी केले आहे. सिनेसृष्टीतील कलाकारांकडून पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत जमा करण्यात आली आहे. यावेळी संतोष जुवेकर म्हणाला, इतर सर्व गोष्टींपेक्षा हे आमचे प्रथम कर्तव्य आहे, असे म्हणत माणुसकीच नात जुवेकरने जपलं आहे.

तसेच पूरग्रस्तांसाठी सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सगळेच मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. संवेदनशील अभिनेता म्हणून ओळख असणारा तसंच समाजकार्यात नेहमीच पुढे असणारा खिलाडी अक्षय कुमारनेदेखील सांगली आणि कोल्हापूरातील पूरग्रस्तांसाठी एक खास संदेश पाठवला आहे. शिवाजी महाराजांनी संकटांशी लढण्याची शिकवण दिली; अक्षय कुमारने पूरग्रस्तांना दिलासा दिला आहे.

दरम्यान, या हलाखीच्या परिस्थितीत पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. अनेक सेवाभावी संस्था पुढे आल्या आहेत. मदत करत आहेत. एका बाजूने प्रशासकीय मदत केली जात आहे. तर अनेक नेत्यांनी वैयक्तिक स्तरावर देखील मोठी आर्थिक मदत केली आहे.

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!