🕒 1 min read
मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांचे नगरविकास खात्याच्या कार्यालयात जाऊन फाईल्स चाळल्याचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत(Sachin Sawant) यांनी सोमय्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तद्पश्चात आता मंत्रालयात जाऊन फाईल्स तपासताना मी कोणत्याही गोपनीयतेचा भंग केला नसून मी केवळ घोटाळेबाज नेत्यांची माहिती घेतली, असे स्पष्टीकरण किरीट सोमय्या यांनी दिले आहे.
I have seen, had inspection of Pratap Sarnaik ₹18 crore Waiver file and also Show Cabinet Notes today under RTI at Mantralaya 4 th Floor, Urban Development Department. It's as per RTI Law.
Inspite of Finance Ministry Objections Thackeray Sarkar gave ₹28 crore Gift to Sarnaik
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 24, 2022
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना किरीट सोमय्या म्हणाले की,‘मी कोणत्याही गोपनीयतेचा भंग केला नसून मी केवळ घोटाळेबाज नेत्यांची माहिती घेतली आहे. तसेच मी कोणाच्या फाईल्स पाहिल्या, याची भीती काँग्रेसला का वाटत आहे’, असा सवालही त्यांनी केला आहे.
As per Maharashtra Cabinet Notes,as on 1 January 2013, Pratap Sarnaik was to pay ₹3,33,96,842 Penalty for Unauthorised Construction of Vihang Garden & for delayed payment, 18% cumulative interest till 12 Jan 2022
Thackeray Sarkar waived ₹18.10 Crores of Shivsena MLA Sarnaik pic.twitter.com/HAgIVtNJQb
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 24, 2022
दरम्यान, किरीट सोमय्यांचे नगरविकास खात्याच्या कार्यालयात जाऊन फाईल्स चाळल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावर टीका करत सचिन सावंत म्हणाले की होते,‘सोमय्या कोणत्या अधिकाराखाली याठिकाणी गेले होते? या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. तसेच यासाठी सोमय्यांवर ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट कायद्याचे उल्लंघन आणि सरकारी कार्यालयात घुसखोरी या कलमांखाली गुन्हा दाखल होऊ शकतो,’ असेही सावंत म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
- ही तर सुरुवात आहे, भविष्यात प्रदीप कंद यांची कामगिरी आणखी चांगली असेल-चंद्रकांत पाटील
- ‘तुम्ही जे आरोप केले त्याचे पुरावे द्या’; सोलापूर जिल्हा परिषदेचे डिसले यांना पत्र
- पर्यटनमंत्री साहेब, दौऱ्यावर आला आहातच तर आम्हालाही भेटा..!
- “पाकिस्तान पुन्हा भारताला हरवणार, कारण…”, यंदाच्या वर्ल्डकपपूर्वीचं शोएब अख्तरनं केली भविष्यवाणी!
- ‘…यांची मानसिक स्थिती अत्यंत खालावली आहे’; कॉंग्रेसची किरीट सोमय्यांवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
