Share

‘सत्ताधाऱ्यांना चारी मुंड्या चित करणार’; भाजपच्या नेत्यांचा संकल्प

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Election) अनुषंगाने आता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. याच निवडणुका समोर ठेऊन शिवसेनेने ५०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा देखील केली. तसेच विरोधक देखील चांगलेच तयारीला लागले असल्याचे दिसत आहे.

आगामी निवडणुका लक्षात घेत सत्ताधाऱ्यांना कसं हरवायचं तसेच आता मुंबई महापालिकेवर कमळ कसं फुलवायचं याची जोरदार तयारी सध्या भाजप करत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी भाजपचे नेते आणि पदाधिकारी यांची महत्वाची बैठक पार पडली.

यावेळी बोलताना भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, मुंबई महापालिका निवडणुका कधीही येवोत. सत्ताधाऱ्यांना चारी मुंड्या चित करण्यासाठीच्या मुंबईतील जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा या स्वरुपाचा सर्व ठोस कार्यक्रम ठरला आहे. त्याच्या रचना लावल्या, काही गोष्टींची उजळणी केलीय, आगामी कार्यक्रमांची तयारी सुरु झाली आहे. या सगळ्या चर्चेतून पुन्हा एकदा नव्या दमाने मुंबई महापालिकेत भाजपचंच कमळ फुलणार हा संकल्प घेऊन आम्ही बैठक केली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!