🕒 1 min read
मुंबई: राज्यात आधीच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण तापले आहे. कुठल्या तरी गावगुंडाचे नाव मोदी सांगत त्याला मारू शकतो तसेच शिव्या देऊ शकतो असं वादग्रस्त वक्तव्यं नाना पटोले यांनी केलं होतं. यावर राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांकडून तीव्र निषेध करण्यात आला. त्यात आता आणखी भर म्हणजे कॉंग्रेसचेच नेते तसेच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी एक वादग्रस्त वक्तव्यं केलं आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यवतमाळमधील वणी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सरसंघचालक हेडगेवार यांचा एक किस्सा सांगितला आहे. राऊत म्हणाले, हेडगेवार (Hedgewar) नावाचे सरसंघचालक नाशिकमध्ये मुक्कामी होती. नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhashchandra Bose) यांनी आपल्या खासगी सचिवाला निरोप देऊन नाशिकला त्यांच्या भेटीला पाठवलं. त्या खासगी सचिवाने हेडगेवारांच्या माणसाला भेटायचं असल्याचं सांगितलं. खासगी सचिव दारात उभे असताना, ती व्यक्ती आतमध्ये जाऊन हेडगेवारांना सांगते की तुम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडून निरोप आला आहे. त्यांचे खासगी सचिव आले आहेत.
पुढे राऊत म्हणाले, यावेळी हेडगेवार आपण आजारी आहोत, भेटायचं नाही असं सांगण्यास सांगतात. मी जर आज त्यांना भेटलो तर ब्रिटीश आमच्यासोबत काय करतील…कदाचित जेलमध्ये टाकतील. हे सगळं तो गृहस्थ बाहेरुन ऐकत होता. तर हे असे गुलाम लोक आज आपल्याला शिकवू लागले आहेत. दुर्दैवाने विचारसुद्धा इतके विषारी झाले आहेत की यांनी धर्मा-धर्मात, जाती-जातीत तंटे निर्माण केले आहेत, असा घणाघात यावेळी केला. सरसंघचालक हेडगेवार यांनी १९३० मध्ये यवतमाळ जिल्ह्यात जंगल सत्याग्रह केला. आता करळगाव येथील जंगलात संग्रहालय उभारण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
महत्वाच्या बातम्या:
-
‘हिंदुत्वाच्या गप्पा कसल्या मारता, औरंगाबादचे संभाजीनगर करता आले नाही..’ फडणवीसांचा टोला!
-
क्रांती चौक ते गोपाल टी रस्त्याचे कायापालट होणार; आमदार संजय शिरसाट यांचा ग्रीन सिग्नल!
-
छोट्या कपड्यातील श्रीवल्ली फेम रश्मिका झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले..
-
“मंत्रालयात जाऊन फाईल्स तपासताना मी कोणत्याही गोपनीयतेचा भंग केलेला नाही”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
