नांदेड: सध्या राज्यात राजकारण फार वेगळ्या पातळीवर जात आहे. पातळी सोडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे सध्या बघायला मिळत आहे. भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेते यांच्यात रोजच टीका होत असते. मात्र आता या टीका वयक्तिक पातळीवर येऊन पोहोचल्या आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या सध्या महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या रडारवर आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा एक मंत्रालयातला फोटो व्हायरल झाला. त्यानंतर कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी टीका करणं सुरू केलं. यावर किरीट सोमय्या यांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे. त्यात आता राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याने म्हणजेच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देखील अत्यंत वादग्रस्त अशी टीका किरीट सोमय्या यांच्यावर केली आहे.
नवाब मलिक किरीट (Nawab Malik) सोमय्या यांच्यावर टीका करताना म्हणाले, चित्रपट जशी चालवण्यासाठी आयटर्म गर्लची गरज लागते. मला वाटतं राजकीय क्षेत्रामध्ये किरीट सोमय्या भाजपाच्या आयटम गर्ल सारखे राजकारण करत आहेत. बातमी कशी होईल त्यासाठी आयटर्म गर्लचा कार्यक्रम सुरु आहे, असे नवाब मलिक यांनी नांदेड येथे माध्यमांसोबत बोलताना म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
“पाकिस्तान पुन्हा भारताला हरवणार, कारण…”, यंदाच्या वर्ल्डकपपूर्वीचं शोएब अख्तरनं केली भविष्यवाणी!
तीन वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर संत एकनाथ रंगमंदिर उद्घाटनासाठी सज्ज..!
‘तुम्ही जे आरोप केले त्याचे पुरावे द्या’; सोलापूर जिल्हा परिषदेचे डिसले यांना पत्र
ही तर सुरुवात आहे, भविष्यात प्रदीप कंद यांची कामगिरी आणखी चांगली असेल-चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

