दिल्ली : खासदार नवनीत राणा यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्देशानुसार नवनीत राणा यांना सुरक्षा देण्यात आली आहे. संपूर्ण देशात कुठेही फिरताना आता नवनीत राणा यांना वाय प्लस सुरक्षेचे कवच सोबत असणार आहे. आता खासदार नवनीत राणा यांचा व्हीव्हीआयपी म्हणजेच अति महत्वाच्या व्यक्तींमध्ये समावेश होणार आहे. नवनीत राणा या खासदार असल्यामुळे अनेक ठिकाणी त्यांना फिरावे लागते, त्यामुळेच त्यांना ही सुरक्षा देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या या सुरक्षेत एसपीओ, एनएसजी कमांडो, सी एसएफचे बंदूकधारी जवान, शासकीय पायालट कार, दोन स्कॉर्पिओ गाड्या, आदी ताफा पुरवण्यात येणार आहे. आता २४ तास हे सुरक्षापथक खासदार नवनीत राणा यांच्यासोबत असणार आहे.
खासदार नवनीत राणा या सातत्याने लोकसभेत राज्य सरकारचा भोंगळ कारभाराचे वाभाडे काढत असतात. देशातील अनेक गंभीर प्रश्नांना वाचा फोडत असतात, म्हणूनच त्यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून गृहमंत्रालयाला देण्यात आला होता. याचीच दखल घेऊन गृहमंत्रालयाने ही सुरक्षा पुरविण्यात आले आहे. आता यापुढे नवनीत राणा यांना सुरक्षेच्या गराड्यात राहावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
IPL 2022 : “विराटप्रमाणं रोहित कॅप्टन्सी सोडेल आणि…”, संजय मांजरेकरांचं ‘बेधडक’ वक्तव्य!
सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, ताबा मात्र सातारा पोलिसांकडे; काय आहे प्रकरण?
Viral Video : ‘आश्विनी ये ना…’, म्हणत आई कुठे काय करते? मालिकेतील ‘या’ कलाकाराने केला भन्नाट डान्स
IPL 2022 : पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये रोहितला खुणावतोय ‘विराट’ विक्रम; आज फक्त २५ धावा करताच….
गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

