Share

नाथषष्टीनिमित्त येणाऱ्या पायी दिंड्याना औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश बंदी

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा एप्रिल महिन्यात होणाऱ्या नाथषष्ठी निमित्त पायी दिंड्यांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे यांनी सांगितले आहे. पैठण येथे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाथ षष्ठी महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यासाठी राज्यभरातून अनेक दिंड्या पैठण नगरित दाखल होत असतात.

नाथषष्टी निमित्ताने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून पायी दिंड्या जवळपास एक महिना अगोदर पैठणकडे येण्यास निघत असतात. पण सद्यस्थितीत सर्वत्र कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

दिवसेंदिवस कोव्हिड रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत असल्याने नाथषष्ठी निमित्त वारकऱ्यांच्या पायी दिंड्यांना औरंगाबाद जिल्ह्यामध्ये प्रवेश देण्यात येणार नसल्याचे गव्हाणे यांनी सांगितले आहे. नाथषष्टी निमित्त होणारी विधिवत पूजा पारंपरिक पद्धतीने होणार असल्याचे डॉ. गव्हाणे यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!