Share

फडणवीसांचा जबाब का घेतला याचे उत्तर दिलीप वळसे पाटलांनी दिले…

Published On: 

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा फोन टॅपिंग आणि पोलीस बदल्याप्रकरणात काल जबाब नोंदवण्यात आला. सुमारे दोन तास फडणवीसांची चौकशी केली गेली. त्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत “या चौकशीदरम्यान आपल्याला सहआरोपी करण्याचा प्रयत्न असल्यासारखे प्रश्न विचारल्याचा” आरोप फडणवीसांनी केला. दरम्यान पोलिसांनी फडणवीसांना नोटीस पाठवल्यापासूनच भाजप नेते आक्रमक झाले होते. त्यानंतर पोलिसांनी फडणवीसांचा जबाब घेतला त्याचा पण भाजपने तीव्र निषेध केला. त्यामुळे फडणवीसांचा जबाब का घेतला गेला याच उत्तर आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे.

फडणवीस मुख्यमंत्री असताना एसआयटीमधून चुकीच्या पद्धतीने फोन टॅपिंग केलं. परवानगी न घेता फोन टॅपिंग केलं गेलं. याबाबत विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात प्रश्न मांडण्याआधीच आम्ही एक समिती नेमली होती. समितीच्या अहवालानंतर एक गुन्हा दाखल झाला. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला. तपास अधिकाऱ्याकडे तपासाचं काम असतं. त्याने 24 लोकांचे जवाब घेतले. त्यांना जे जे वाटलं तसा त्यांनी तपास केला. सीआरपीसीच्या 160च्या नोटीसमध्ये दुसरं काही नाही. तपास अधिकाऱ्यांना कुणालाही जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्याचा अधिकार आहे. आधी प्रश्नावली पाठवली होती. पण त्या नोटिशीला विरोधी पक्षनेत्यांना काही कारणाने उत्तर देता आलं नाही. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी तपास अधिकाऱ्याने 160ची नोटीस पाठवली. याचा अर्थ होतो कि तुम्ही जबाब द्या. तो जबाब पोलीस ठाण्यात घ्यायचा की घरी जाऊन घ्यायचा याची चर्चा झाली आणि जबाब घेतला, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!