Share

“हल्ला करायचाच होता तर ‘मातोश्री’वर…”, दिलीप मोहितेंचे मोठे वक्तव्य

Published On: 

पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर काल (८ एप्रिल) एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. या घटनेनंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच प्रश्न राज्याचा होता, त्यामुळे हल्ला करायचा होता तर ‘मातोश्री’वर करायचा होता, मग तुम्हाला या हल्ल्याची किंमत कळाली असती, असे पाटील म्हणाले.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना दिलीप मोहिते पाटील म्हणाले की,‘प्रश्न राज्याचा होता, त्यामुळे हल्ला करायचा होता तर ‘मातोश्री’वर करायचा होता, मग तुम्हाला या हल्ल्याची किंमत कळाली असती.’ तसेच परिवहन मंत्रीपद हे शिवसेनेच्या अनिल परब यांच्याकडे आहे. त्यामुळे या विषयाशी पवार साहेबांचा दुरान्वये संबंध नाही, असेही पाटील म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘राज्यातील मविआ सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादीचा सर्वात मोठा वाटा आहे, त्यामुळे राष्ट्रवादीला अस्थिर करण्यामागे या शक्ती लागलेल्या आहेत.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!