🕒 1 min read
पणजी : गोव्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री आमदार लुइझिन फालेरो यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यांनी सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सादर केला. ते आता तृणमूल काँग्रेसमध्ये ते प्रवेश करणार आहेत. यानंतर लुइझिन फालेरो यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
गोव्यात काँग्रेसचे सर्वाधिक आमदार असूनही काँग्रेसचं सरकार स्थापन होऊ शकले नाही याला काँग्रेस नेते दिग्विजय सिंह जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केलाय. यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. या पत्रातून काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे.
Former Goa Chief Minister and MLA Luizinho Faleiro in his resignation letter to Congress interim president Sonia Gandhi writes, "I see absolutely no hope or even the will to prevent the collapse of the party and change for the better". pic.twitter.com/BU15Fz8GRq
— ANI (@ANI) September 27, 2021
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत १७ जागा जिंकल्या. आम्हाला अपक्ष आमदारांचाही पाठिंबा होता, पण आमच्या मतभेदांमुळे भाजपाला बहुमत सिद्ध करता आले आणि आम्ही जनतेला निराश केले. या साडेचार वर्षांत मी पक्षाला एकत्र आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी हायकमांडचे दुर्लक्ष झाले, असे फालेरो यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
‘काँग्रेस पक्षासाठी मी गोव्यात लढाई लढलो. पण आता ते शिल्लक नाही. मागील साडेचार वर्षात काँग्रेसची संख्या १८ आमदारांवरुन पाचवर आली आहे. १३ आमदारांनी भाजपत प्रवेश केला आहे. परंतू, याला जबाबदार लोकांवर कोणतीही कारवाई झाली नाही. गोव्यात काँग्रेस सरकार स्थापनेचा दावा करू शकले नाही. यामुळे मला स्वतःची फसवणूक झाल्यासारखं वाटत होते’ अशी खंत फालेरो यांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ईडीनं मला चौकशीसाठी का बोलावलं आहे, हे मला देखील माहिती नाही – परब
- पुढच्या 10 निवडणुकांमध्ये धनंजय मुंडेंना कोणीही रोखू शकणार नाही; जयंत पाटलांचा आत्मविश्वास
- ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’; किरीट सोमय्यांचा कोल्हापूर प्रवेशाचा मार्ग मोकळा
- ‘कॉंग्रेसची सध्याची परिस्थिती पाहता मला पक्षाचे कोणतेही भविष्य दिसत नाही’
- दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही हे पवारसाहेबांनी दाखवून दिले होते – जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
