Share

चिनी कंपनी VIVO साठी आयपीएलचे दार पुन्हा उघडणार; बनू शकते टायटल स्पॉन्सर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या हंगामाची तयारी सुरु झाली आहे. आगामी हंगामापूर्वी सर्व संघांनी आपल्या काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. वृत्तानुसार आयपीएल (IPL) 2021 साठी मिनी लिलाव पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये आयोजित केला जाणार आहे. या लिलावात अनेक परदेशी खेळाडू सहभागी होतील. रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी शेअर केल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 18 फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये लिलाव आयोजित करण्याचं ठरवलं आहे. शीशीर्षक प्रायोजकत्व कोणाला मिळेल यावर अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. चीन-आधारित स्मार्टफोन ब्रँड, VIVO ने 2018 मध्ये टी-20 लीगच्या पाच हंगामांकरिता दर वर्षी 440 कोटी रुपयांत स्पॉन्सरशिप मिळवली होती.

पण, गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात राजकीय पडसादामुळे देशात चीनविरोधी भावना वाढल्या. VIVO वर देखील सर्वांच्या निशाण्यावर आला 2020 चे प्रायोजकत्व म्हणून त्याला माघार घ्यावी लागली. आयपीएल 2021 ची तयारी चालू असताना प्रायोजकत्वाच्या स्थितीबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण मिळालेले नाही.

Cricbuzzच्या वृत्तानुसार, लीगच्या 14 व्या आवृत्ती तसेच आगामी मोसमातील शीर्षक प्रायोजक म्हणून बीसीसीआय VIVO साठी स्पर्धेचे स्पॉन्सर म्हणून दार उघडण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयने ड्रीम 11 ला मागील वर्षी 2021 आणि आगामी हंगामात जास्तीत जास्त रक्कमेची बोली लावण्याची संधी दिली होती परंतु 2020 हंगामात दिलेल्या रक्कमेपेक्षा जास्त देण्यास ते उत्सुक दिसले नाही. आणि सध्या स्थितीकडे पाहता बोर्ड अद्यापही प्रायोजकाच्या शोधात आहे.

ज्यामुळे 18 फेब्रुवारी रोजी होणारा लिलाव शीर्षक प्रायोजकच्या अनुपस्थितीत होईल असे दिसत आहे. दरम्यान, VIVO चे पुनरागमन भारत-चीन यांच्यातील राजकीय स्थितीवर अवलंबून आहे मात्र सध्याची स्थिती पाहता चिनी मोबाईल निर्मात्याचे कमबॅक बर्‍यापैकी अवघड दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!