मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेअयोध्या दौरा करणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. येत्या १ ते ९ मार्च दरम्यान राज यांच्या अयोध्या दौऱ्याचं नियोजन पक्षाकडून केलं जात असल्याचं समजतं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेची आज दुसऱ्यांदा महत्वपूर्ण बैठक होत आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला राज्यातील मनसेचे सर्व बडे नेते उपस्थित आहेत.
मनसेने पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर हिंदुत्वाच्या मार्गावर पक्ष लक्ष केंद्रीत करत असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये वितुष्ट निर्माण झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात भाजप आणि मनसेची युती होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. विशेष म्हणजे, युतीच्या या गणितांबाबत भाजप नेत्यांना विचारण्यात आलं असता त्यांनी वेळोवेळी थेट नकार दिला नव्हता.
मनसेची उत्तर भारतीयांविरोधाची भूमिका मवाळ झाली तर पुढचा विचार होऊ शकेल, असंही भाजपकडून विधान करण्यात आलं होतं. आता राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यानं ही मनसे आणि भाजपच्या युतीची नांदी तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- “क्रिकेट ग्राउंडच विकत घे,” इरफान पठानचा रिषभ पंतला मजेशीर सल्ला
- मुंबईकरांना मोठा दिलासा! ‘या’ तारखेपासून सर्वसामान्यांनाही करता येणार लोकलने प्रवास
- ‘लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनेच्या आडून सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही’
- अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींकडून कृषी कायद्यांच कौतुक !
- लाच प्रकरणी कळमनुरीचा गटविकास अधिकारी अटकेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

