Share

कोरोना युध्दात आपला जीव गमावणाऱ्या पोलीस हवालदाराच्या वारसांना मिळाली ६० लाखांची मदत

Published On: 

देगलूर : कोरोनाच्या संसर्गामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना ६० लाख रूपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. त्या निर्णयानुसार नांदेड जिल्ह्य़ात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या वारसांना राज्य सरकार तर्फे मदत देण्यात आली.

देगलूर तालुक्यातल्या मुक्रमाबाद इथे सेवेवर असलेले पोलीस रामलू आलूरे यांचं गेल्या वर्षी ८ ऑक्टोबर रोजी कोरोनाबाधेमुळे निधन झालं होतं. राज्य शासनाच्या वतीने त्यांच्या पत्नीला आणि दोन मुलींना प्रत्येकी वीस लाख रुपयांचे तीन धनादेश जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.त्यावेळी अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे हे सुध्दा उपस्थित होते.

आपल्या 26 वर्षाच्या सेवेत रामलू आलूरे यांनी पोलीस मुख्यालय, पोलीस ठाणे रामतिर्थ, देगलूर, कुंडलवाडी आणि मुक्रामाबाद या ठिकाणी सेवा केली आहे.रामलू आलुरेच्या वारसदारांनी पोलीस दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतांना पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांना धन्यवाद दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!